AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेंचे बनावट आधारकार्ड जप्त, पंचतारांकित हॉटेलात सीसीटीव्ही NIA च्या ताब्यात

सचिन वाझे यांच्या बनावट आधार कार्डवर सुशांत सदाशिव खामकर असे नाव देण्यात आले आहे. (Sachin Vaze Fake Aadhar Card)

सचिन वाझेंचे बनावट आधारकार्ड जप्त, पंचतारांकित हॉटेलात सीसीटीव्ही NIA च्या ताब्यात
| Updated on: Mar 23, 2021 | 2:01 PM
Share

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सचिन वाझे यांचे बनावट आधारकार्ड समोर आलं आहे. याच आधारकार्डचा वापर करत वाझे हे ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Sachin Vaze Fake Aadhar Card trident hotel cctv Confiscated)

सचिन वाझे यांचे बनावट आधार नुकतंच समोर आलं आहे. सचिन वाझे हे याच आधार कार्डचा वापर करत असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे सचिन वाझे हे हेच आधार कार्ड वापरुन ट्रायडेंटमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या बनावट आधार कार्डवर सुशांत सदाशिव खामकर असे नाव देण्यात आले आहे. त्यावर वाढदिवसाची तारीखही लिहिण्यात आली आहे.

ट्रायडेंटमधील सीसीटीव्ही ताब्यात 

तर दुसरीकडे एनआयए (NIA) कडून  ट्रायडेंट हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. NIA ने हे सर्व सीसीटिव्हींची तपासणी केली आहे. यातील एका तपासणीत एनआयएच्या हाती सचिन वाझे यांचे फुटेज लागले आहे. यात सचिन वाझे यांच्या हाती पाच मोठमोठ्या बॅगा दिसत आहे. त्या बॅगेत पैसे आहेत की आणखी काय? याची अद्याप माहिती आलेली नाही.

दुसऱ्या एका सीसीटिव्हीत एक महिला दिसत आहे. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याची मशीन दिसत आहे. या महिलेचा सचिन वाझे यांच्याशी काही संबंध आहे का? ती महिला सचिन वाझेंना ओळखते का? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. तसेच सद्यस्थितीत या महिलेचा शोध घेतला जात आहे. सचिन वाझे यांच्या हातात जे पाच बॅग आहे. त्यात जिलेटीन असल्याचा संशय एनआयए (NIA) ने व्यक्त केला आहे.

बनावट आधारकार्ड, पंचतारांकित हॉटेलात मुक्काम

वाझेंच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझे बनावट आधारकार्ड दाखवून पंचतारांकीत हॉटेलात राहत होते. वाझेंकडून बनावट आधारकार्डही जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाझे 16 फेब्रुवारी रोजी हॉटेलात थांबले होते. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएने जप्त केले आहेत. बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलात राहण्याचे कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.

हप्ते वसुलीची डायरी हाती?

वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.  (Sachin Vaze Fake Aadhar Card trident hotel cctv Confiscated)

संबंधित बातम्या : 

सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती, कोड लँग्वेजमधील हिशोब उघडकीस?

अनिल देशमुखांकडून ‘सर्वोच्च’ लढाईसाठी मोर्चेबांधणी; ज्ञानेश्वरी बंगल्यावर गुप्त खलबतं

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....