स्वत:च्या हत्येचा बनाव रचण्यासाठी तिने तिच्यासारख्या दिसणाऱ्या तरूणीला ठार केले

| Updated on: Feb 02, 2023 | 11:46 AM

पोलीस म्हणाले की, ही अगदी एक्स्ट्राऑर्डीनरी केस आहे. ही केस उकल करण्यासाठी आम्हाला आमचे सर्व कौशल्य पणाला लावायला लागले. ज्या दिवशी आम्हाला एका तरूणीची बॉडी सापडली त्यावेळी आम्हाला वाटलेही नव्हते की केस या वळणावर येऊन पोहचेल !

स्वत:च्या हत्येचा बनाव रचण्यासाठी तिने तिच्यासारख्या दिसणाऱ्या तरूणीला ठार केले
judwa
Image Credit source: socialmedia
Follow us on

जर्मनी : असे म्हणतात जगात आपल्या सारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती असतात. इन्स्टाग्रामवर तिला डिट्टो तिच्याच सारखी दिसणारी ती दिसली, त्यानंतर तिच्या डोक्याच एक खतरनाक कल्पना आली. जर हिला आपण ठार केले तर लोकांना वाटेल आपलाच मृत्यू झाला आहे, त्यामुळे तिने पन्नास वेळा चाकू खुपसून तिला ठार करीत तिचा मृतदेह मर्सिडीज गाडीत लपवला. परंतू ‘कानून के हाथ लंबे होते है’, या न्यायाने पोलीस तिच्यापर्यंत पोहचलेच.  तिने स्वत:च्याच मृत्यूचा कट का रचला ? हे वाचणे इंटेरेस्टीक आहे.

दक्षिण जर्मनीच्या इंगोस्टाटं या शहरात एका तरूणीला स्वत:च्याच हत्येचा बनाव रचल्या प्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. गेल्या उन्हाळ्यात एका मर्सिडीज कारमध्ये पोलिसांना एका तरूणीचा मृतदेह सापडला होता. या तरूणीवर धारदार चाकूचे तब्बल पन्नास वार झाले होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतू या तरूणीला तिच्याच सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका तरूणीने संपवले आणि त्यामागील कारणही अजब आहे.

स्थानिक पोलीस पथकातील अॅंड्रीस एचीले यांनी युकेतील एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की ही अगदी एक्स्ट्राऑर्डीनरी केस आहे. ही केस उकल करण्यासाठी आम्हाला आमचे सर्व कौशल्य पणाला लावायला लागले. ज्या दिवशी आम्हाला एका तरूणीची बॉडी सापडली त्यावेळी आम्हाला वाटलेही नव्हते की केस या वळणावर येऊन पोहचेल.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात २३ वर्षीय जर्मन-इराणीयन तरूणी शहराबन के. ही आपल्या विभक्त पतीला भेटायला जर्मनीच्या इंगोस्टाटं शहरात गेली, ती पुन्हा घरी परतली नसल्याने पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. जेव्हा तिच्या पालकांनी तिची शोधाशोध केली तेव्हा दानुब नदीच्या जवळ एका मर्सिडीज कारजवळ तिचा मृतदेह निपचित पडलेला आढळला. तिच्यावर भयंकर वार करण्यात आले होते. तिचा मृतदेह तिचा बॉयफ्रेंड ( कोसोवन के. ) याच्या घराजवळ सापडला. तिचा चेहरा तिच्या मुलीच्या सारखा दिसत असल्याने तिला तिच्या विभक्त पतीनेच मारले असावे असे पोलीसांना सुरूवातीला वाटले. परंतू मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता ही महिला खदीजा नावाची २३ वर्षीय अल्जेरीयन नागरीक निघाली.

पोलीसांनी शहराबन के. हीच्या सोशल मिडीयावरील अॅक्टीविटी शोधल्या तेव्हा त्यांना समजले की इन्स्टाग्राम वरील तिच्याच सारख्या दिसायला असणाऱ्या एका तरूणीला तिने अनेकवेळा संपर्क केल्याचे उघड झाले. शहराबन हीने खदीजा हीला भेटायला बोलावल्याचा पोलीसांचा दावा आहे. पोलीसांनी केलेल्या आरोपानूसार शहराबन के.आणि तिचा मित्र शेकीर के. (२३ ) या दोघांनी इप्पींगजेन येथे जाऊन खदीजा हीला पिकअप केले. आणि वूडलँड येथे नेऊन तिची निर्घूणपणे हत्या केली. त्यांना तिचा मृतदेह शेकीरच्या घराजवळ कारमध्ये ठेवला. पोलीसांनी या कपलला खूनाप्रकरणी अटक केली आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेप होण्याची शक्यता आहे. शहराबन हीने या खूनामागचे कोणताही अधिकृत हेतू उघड केलेला नाहीय, परंतू जर्मन मिडीयाच्या सूत्रानूसार तिला कौटुंबिक वादापासून मुक्तता हवी होती म्हणून तिने स्वत:च्याच हत्येचा कट रचल्याचे म्हटले जात आहे.