डोक्यात फावडे घालून हत्या करणाऱ्या तिघांना बेड्या, शिर्डीतील पती-पत्नीच्या खुनाचा उलगडा

| Updated on: Jun 29, 2021 | 8:17 PM

शिर्डी जवळील कोऱ्हाळे येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केल्याचा दावा केला आहे. दरोड्याच्या उद्देशाने पती- पत्नीचा खून करण्यात आला असल्याचे सांगत याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

डोक्यात फावडे घालून हत्या करणाऱ्या तिघांना बेड्या, शिर्डीतील पती-पत्नीच्या खुनाचा उलगडा
सांकेतिक फोटो
Follow us on

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी जवळील कोऱ्हाळे येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केल्याचा दावा केला आहे. दरोड्याच्या उद्देशाने पती- पत्नीचा खून करण्यात आला असल्याचे सांगत याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. परिस्थीतीजन्य पुरावे, दरोड्याच्या अगोदर खून करण्याची आरोपींची पद्धत यामुळे या खुनाचा उलगडा झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.  (Shirdi police solved the mystery of husband and wife murder arrested three accused)

दाम्पत्यांची डोक्यात फावडे घालून निर्घृण हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जूनच्या रात्री कोऱ्हाळे शिवारातील चांगले मळ्यातील शशिकांत चांगले ( वय 60) व सिंधूबाई चांगले ( वय 50 ) या दाम्पत्यांची फावडे डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. खुनाचा तपास लवकर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. जमिनीच्या वादाव्यतिरिक्त खुनाचे कारण काय असावे, या सर्व बाजूने पोलीस तपास करत होते.

सापळा रचून तिघांना जेरबंद

आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले होते. दरम्यान पो.नि अनिल कटके यांना गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती मिळली. हा गुन्हा कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील बेंद्रया भोसले याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून नाट्यमय ‌रित्या तिघांना जेरबंद केले.

दोघे फारार, शोध सुरु

दुहेरी हत्येप्रकरणी बेंद्र्या उर्फ देवेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले याचे साथीदार दिलीप भोसले, आवेल भोसले या दोघांनाही बेड्या ‌ठोकल्या आहेत. आणखी दोन साथीदार मायकल चव्हाण, डोंगऱ्या चव्हाण दोघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या :

पुण्यात टोळीयुद्ध वाढली, सहा महिन्यात हत्येच्या प्रयत्नाचे 139 गुन्हे, 38 हत्याकांड

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या

धनलाभाच्या मोहातून घोरपडीच्या अवयवांची विक्री, नाशकात एकाला बेड्या

(Shirdi police solved the mystery of husband and wife murder arrested three accused)