धनलाभाच्या मोहातून घोरपडीच्या अवयवांची विक्री, नाशकात एकाला बेड्या

घोरपडीचे लिंग किंवा हातांची जोडी जवळ बाळगल्यास धनलाभ होतो, असा समज आहे. या अंधश्रद्धेपोटीच घोरपडीच्या अवयवांची विक्री केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धनलाभाच्या मोहातून घोरपडीच्या अवयवांची विक्री, नाशकात एकाला बेड्या
घोरपडीच्या अवयवांची तस्करी, आरोपीला अटक

नाशिक : घोरपडीच्या अवयवांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे. अंधश्रद्धेतून घोरपडीच्या अवयवांची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. धनलाभाच्या आशेने काही जण घोरपडीचे अवयव जवळ बाळगत असल्याचं उघडकीस आलं आहे. (Nashik Ghorpad Bengal monitor hand genital body organs detained)

संशयित आरोपी घोरपडीच्या अवयवांच्या विक्रीचा प्रयत्न करत होता. घोरपडीचे लिंग किंवा हातांची जोडी जवळ बाळगल्यास धनलाभ होतो, असा समज आहे. या अंधश्रद्धेपोटीच घोरपडीच्या अवयवांची विक्री केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नाशिकमधील द्वारका परिसरातून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींकडून काही मुद्देमाल आणि घोरपडीचे हात जोडे हस्तगत करण्यात आले आहेत.

घोरपडीविषयी अंधश्रद्धा काय?

घोरपड हा सरपटणारा वन्य प्राणी आहे. अंधश्रद्धेतून घोरपडीच्या शिकारींचे प्रमाण वाढत चालले आहे. याचप्रमाणे घोरपडीच्या कातड्यापासून एक प्रकारचे तेल बनवण्यात येते. हे तेल सांधेदुखी, वात विकारांवर उपयुक्त असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे घोरपडीने शेपटी मारल्यास संबंधित पुरुषाला नपुंसकत्व येते असाही एक गैरसमज आहे

मांडूळांचीही तस्करी

दरम्यान, अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांची किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाचीही तस्करी होत असल्याचं उघड झालं आहे. काही महिन्यांपूर्वी दोघा आरोपींकडून हिंगोली पोलिसांनी दोन जिवंत मांडूळ जप्त केले होते. या मांडूळांची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

मांडूळाची तस्करी कशासाठी केली जाते?

मांडूळाद्वारे काळू जादू, अघोरी विद्या, पैशांचा पाऊस, गुप्त धन शोधणे यासारख्या अंद्धश्रद्धांतून मांडूळांचा उपयोग सर्रास केला जातो. सरकारने मांडूळांच्या तस्करींवर बंदी आणल्यानंतर त्याची तस्करी सुरुच आहे. या मांडूळांची किंमत लाखोंच्या घरात असते.

मांडूळाचा वापर कशासाठी?

मांडूळ हा एक सापाचा प्रकार आहे. या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी तसंच परदेशात कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. मांडूळाचा वापर सांधेदुखीवरही केला जातो तसेच या सापाच्या कातड्याचा वापर कॉस्मेटिक्स, पर्स, जॅकेटसाठीही केला जातो. तर मलेशियात या सापाबाबत एक अंधश्रद्धा प्रचलित आहे. लाल मांडूळ साप व्यक्तीचं नशीब चमकवू शकतो, असे तेथील लोक मानतात.

संबंधित बातम्या :

हिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत, का होते तस्करी?, काय आहेत अंधश्रद्धा?

(Nashik Ghorpad Bengal monitor hand genital body organs detained)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI