हिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत, का होते तस्करी?, काय आहेत अंधश्रद्धा?

हिंगोलीत लाखो रुपयांच्या मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत, का होते तस्करी?, काय आहेत अंधश्रद्धा?

आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांची किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Akshay Adhav

|

Jan 20, 2021 | 10:24 AM

हिंगोली : आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांची किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दोघा आरोपींकडून दोन जिवंत मांडूळ जप्त करण्यात आली असून या मांडूळांची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Smuggling of rare species of Snanke In jalna two Accussed Arrested)

स्थानिक गुन्हे शाखेला ही गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जालन्यातील सेनगाव तालुक्यातील जहागीर आणि सरकळी गावातील सतीश कांबळे आणि दत्ताराव साठे हे मांडूळांची तस्करी करण्यासाठी मांडूळ जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केली असता काळ्या रंगाचे मांडूळ त्यांना आढळून आले. दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

पोलिसांनी जप्त केलेले मांडूळ पुढील कार्यवाहीसाठी विभागीय वनाधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदर कारवाई पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस उनिरीक्षक उदय खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

मांडूळाची तस्करी कशासाठी केली जाते?

मांडूळाबाबत बऱ्याच अंद्धश्रद्धा आहेत. मांडूळाद्वारे काळू जादू, अघोरी विद्या, पैशांचा पाऊस, गुप्त धन शोधणे… या आणि अशाच बऱ्याच अंद्धश्रद्धांसाठी मांडूळांचा उपयोग सऱ्हास केला जातो. सरकार आणि प्रशासनाने मांडूळांच्या तस्करींवर बंदी आणली आहे. मात्र तरीही चोरुन-लपून अशी तस्करी होते. या मांडूळांची किंमत लाखोंच्या घरात असते.

मांडूळाचा वापर कशासाठी?

मांडूळ हा एक सापाचा प्रकार आहे. या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी तसंच विदेशात कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो.

मांडूळाचा वापर सांधेदुखीवरही केला जातो तसेच या सापाच्या कातड्याचा वापर कॉस्मेटिक्स, पर्स, जॅकेटसाठीही केला जातो. तर मलेशियात या सापाबाबत एक अंधविश्वास प्रचलित आहे. लाल मांडूळ साप व्यक्तीचं नशीब चमकवू शकतो, असे तेथील लोक मानतात.

(Smuggling of rare species of Snanke In jalna two Accussed Arrested)

हे ही वाचा

फॉरेन रिटर्न ‘डॉक्टरीण’, वंचित पुरस्कृत पॅनलमधून डॉ. चित्रा ग्रामपंचायतीत विजयी

चंद्रपुरात येणारा 50 लाखांचा दारुसाठा आमदाराने पकडला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

‘मै यहां तू वहां’ परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न, बिग बींमुळे पोलिस दाम्पत्य आगीतून फुफाट्यात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें