‘मै यहां तू वहां’ परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न, बिग बींमुळे पोलिस दाम्पत्य आगीतून फुफाट्यात

मध्य प्रदेशातील परिहार दाम्पत्याचं पोस्टिंग एकाच शहरात होईल, याची काळजी घेण्याचं आवाहन अमिताभ बच्चन यांनी केबीसीतून केलं होतं (Amitabh Bachchan Police Couple )

'मै यहां तू वहां' परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न, बिग बींमुळे पोलिस दाम्पत्य आगीतून फुफाट्यात
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 9:03 AM

भोपाळ : ‘बागबान’ चित्रपटात ‘मै यहां तू वहां’ गाण्यातून बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नाईलाजास्तव एकमेकांपासून दूर राहावं लागणाऱ्या वृद्ध जोडप्याची व्यथा मांडली होती. ऐन तारुण्यात अशीच काहीशी वेळ आलेल्या पोलीस जोडप्याला हा त्रास होऊ नये, म्हणून बिग बींनी जाहीर विनंती केली. बच्चन यांच्या आवाहनानंतर दूरवर ट्रान्सफर झालेल्या मध्य प्रदेशातील पोलिस दाम्पत्याला दिलासा मिळणार होता, मात्र एक नवीन प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. (Amitabh Bachchan requests to solve Madhya Pradesh Police Couple plea ends up increasing trouble)

पती मंदसौरमध्ये पत्नी ग्वाल्हेरमध्ये

वाहतूक पोलीस काँस्टेबल विवेक परिहार कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati – KBC) या गेम शोमध्ये सहभागी झाले होते. मंदसौरमध्ये पोस्टिंग असल्यामुळे मी तिथे एकटाच राहतो, तर पत्नीची ग्वाल्हेर शहरात बदली झाल्यामुळे दुरावा आल्याची व्यथा विवेक परिहार यांनी कार्यक्रमात मांडली होती. त्यानंतर इंदरगंज पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या प्रिती परिहार यांनीही पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.

दाम्पत्याचा विरह संपवा, बिग बींचं आवाहन

परिहार यांचं म्हणणं ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमातूनच जाहीर आवाहन केलं होतं. मध्य प्रदेशात वाहतूक पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न जो कोणी हाताळत असेल, त्यांनी परिहार दाम्पत्याचं पोस्टिंग एकाच शहरात होईल, याची काळजी घ्यावी. कृपया त्यांचा विरह संपवा, तुम्हाला त्याचा फटका बसणार नाही, असं बिग बी म्हणाले होते. विवेक परिहार यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये 25 लाख रुपयांची रक्कम जिंकली.

भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अमिताभ बच्चन यांचं आवाहन मंदसौरचे भाजप आमदार यशपाल सिसोदिया (Yashpal Sisodiya) यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि डीजीपी यांना परिहार दाम्पत्यातील दुरावा मिटवण्याचं आवाहन केलं.

परिहार दाम्पत्याची व्यथा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. अखेर 18 जानेवारीला पोलिस हेडक्वार्टर्समधून बदलीचे आदेश निघाले. मंदसौरमध्ये नार्कोटिक्स विभागात प्रिती परिहार यांची तीन वर्षांसाठी बदली करण्यात आली. (Amitabh Bachchan requests to solve Madhya Pradesh Police Couple plea ends up increasing trouble)

आसमानसे टपके खजूर पे अटके

बदलीच्या आदेशामुळे विवेक परिहार आणखी बुचकळ्यात पडले. कारण पत्नीची नाही, तर आपली बदली करण्याची त्यांची मागणी होती. “माझे वृद्ध आई वडील ग्वाल्हेरमध्ये राहतात. माझ्या पत्नीची मंदसौरला बदली झाल्यामुळे आमचा त्रास वाढला. आता माझ्या पालकांची काळजी कोण घेणार?” असा प्रश्न त्यांनी विचारला. परिहार यांची परिस्थितीत ‘आसमानसे टपके खजूर पे अटके’ अशी झाल्याचं यशपाल सिसोदियांनी पुन्हा ट्विट करत सांगितलं. त्यामुळे विवेक परिहार यांची नेमकी मागणी पूर्ण होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सिसोदियांकडून समस्या मिटवण्याचं आवाहन

संबंधित बातम्या :

‘बाहुबली’ला स्वप्नपूर्तीचा आनंद, दीपिका-प्रभासच्या चित्रपटात महानायकाची एंट्री!

लडाखमध्ये मायनस 33 डिग्री तापमान; अमिताभ बच्चन म्हणतात थर्मल सूट घालूनही…

(Amitabh Bachchan requests to solve Madhya Pradesh Police Couple plea ends up increasing trouble)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.