Amitabh Bachchan | ‘बाहुबली’ला स्वप्नपूर्तीचा आनंद, दीपिका-प्रभासच्या चित्रपटात महानायकाची एंट्री!

Amitabh Bachchan | ‘बाहुबली’ला स्वप्नपूर्तीचा आनंद, दीपिका-प्रभासच्या चित्रपटात महानायकाची एंट्री!

‘अखेर स्वप्न पूर्ण होत आहे. मी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे’, असे म्हणत ‘बहुबली’ अभिनेता प्रभासने आपला आनंद व्यक्त केला आहे.

Harshada Bhirvandekar

|

Oct 09, 2020 | 2:35 PM

मुंबई : ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटची चर्चा सध्या बॉलिवूड वर्तुळात चांगलीच गाजत होती. आता या बहुचर्चित चित्रपटात आणखी एका सुपरस्टार एंट्री झाली आहे. चित्रपटसृष्टीचे लाडके ‘महानायक’ म्हणजे अमिताभ बच्चनसुद्धा (Amitabh Bachchan Upcoming Film) या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी (9 ऑक्टोबर) एक टीझर प्रदर्शित करत अमिताभ बच्चन चित्रपटात झळकणार असल्याचे जाहीर केले आहे. (Amitabh bachchan joined deepika padukone and prabhas upcoming film)

वैजयंती मूव्हीजने आपल्या ट्विटर अकाउंटवर 27 सेकंदाचा टीझर पोस्ट केला आहे. ट्विटमध्ये लिहिले की, ‘कोट्यावधी भारतीयांचा अभिमान अमिताभ बच्चन यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांच्यामुळे आता आमचा प्रवासही मोठा होणार आहे,’ असे म्हटले आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अमिताभ यांच्या जुन्या चित्रपटांपासून आत्तापर्यंतच्या चित्रपटातील अनेक पात्रांच्या झलक दाखवल्या आहेत.

खुद्द अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ‘या चित्रपटाचा एक भाग होणं ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे,’ असे कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ही आनंदाची बातमी शेअर करताच चाहते खूप उत्साही झाले आहेत. या चित्रपटातील अमिताभ (Amitabh Bachchan Upcoming Film) यांच्या भूमिकेबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत.

प्रभासला स्वप्नपूर्तीचा आनंद

वैजयंती प्रोडक्शनचा हा व्हिडीओ शेअर करत, ‘अखेर स्वप्न पूर्ण होत आहे. मी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे’, असे म्हणत ‘बहुबली’ अभिनेता प्रभासने आपला आनंद व्यक्त केला आहे. (Amitabh bachchan joined deepika padukone and prabhas upcoming film)

दक्षिणात्य चित्रपट निर्माती कंपनी ‘वैजयंती प्रोडक्शन’ला 50वर्ष पूर्ण होणार असून, या निमित्ताने एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक नाग अश्विन या चित्रपटाची धुरा सांभाळणार असून, हा चित्रपट सायन्स-फिक्शन-थ्रीलर असणार आहे. चित्रपटाचे कथानक तिसऱ्या महायुद्धावर आधारित असणार आहे. 2022मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटासाठी दीपिकाला 20 कोटी तर, प्रभासला 50 कोटींचे मानधन देण्यात आले आहे.

महानायकाच्या चित्रपटांची मेजवानी

अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या चित्रपटांची रीघ लागली आहे. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय झळकणार आहेत. या शिवाय ते नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटातही काम करत आहेत.

(Amitabh bachchan joined deepika padukone and prabhas upcoming film)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें