‘हे’ बिग बी अमिताभ बच्चन आहेत!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ आहे. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा पहिला लूक सध्या आऊट झालेला आहे. यामध्ये बिग बींना ओळखणं अशक्य आहे.

'हे' बिग बी अमिताभ बच्चन आहेत!
Nupur Chilkulwar

|

Jun 21, 2019 | 5:00 PM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ आहे. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा पहिला लूक सध्या आऊट झालेला आहे. यामध्ये बिग बींना ओळखणं अशक्य आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन हे एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. नुकताच बाहेर आलेल्या त्यांच्या या लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ मधील लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी चष्मा घातलेला आहे आणि त्यांच्या डोक्यावर दुपट्टा आहे. तसेच यामध्ये त्यांची लांब दाढी दाखवण्यात आली आहे. हा लूक त्यांचा इतर पात्रांच्या तुलनेत अगदीच वेगळा आणि निराळा वाटत आहे. यामध्ये त्यांचं नाकही जरा वेगळ दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदा पाहिल्यावर हे खरंच बिग बी आहेत, यावर विश्वास बसत नाही.

‘गुलाबो सिताबो’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेता आयुष्मान खुराना आहे. ‘गुलाबो सिताबो’ हा अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा एकत्र पहिलाच सिनेमा असणार आहे. दिग्दर्शक शूजित सरकारने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

काहीच दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. यासोबत त्यांनी “एक संपली दूसरी सुरु. ट्रॅव्हल, लोकेशन चेन्ज, लूक चेन्ज, क्रू चेन्ज, कलीग चेन्ज, सिटी चेन्जआणि स्टोरी चेन्ज. लखनऊ ते गुलाबो सिताबो आणि लूक? असो, मी आणखी काय म्हणणार…”, असं लिहिलं होतं.

‘गुलाबो सिताबो’ हा एक विनोदी सिनेमा आहे. यामध्ये लखनऊमधील एका विचित्र आणि विनोदी कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या सिनेमा जूही चतुर्वेदी यांनी लिहिला. जूही चतुर्वेदी यांनी यापूर्वी विकी डोनर, ओक्टोबर आणि पीकू सारखे सिनेमे लिहिले आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 24 एप्रिलला प्रदर्शित होईल.

संबंधित बातम्या :

VIDEO : पुतण्याच्या वाढदिवशी सलमानचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

संजू’बाबा’ मराठीत, सिनेमाचं पोस्टर लॉन्च

राजामौलींच्या नव्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच 70 कोटींची कमाई

रणवीर सिंह रंगेबेरंगी कपडे का घालतो? उत्तर सापडलं!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें