राजामौलींच्या नव्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच 70 कोटींची कमाई

बाहुबली सिरीजला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजामौलींच्या आगामी सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनचं या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली.

राजामौलींच्या नव्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच 70 कोटींची कमाई

मुंबई : बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित अशा ‘आरआरआर’ या सिनेमाने प्रदर्शनाआधीच रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच परदेशातील थिएटर राई्टसह आतापर्यंत तब्बल 70 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं शूटिंग अद्याप संपलेलं नाही. तरीही या सिनेमाने फक्त हक्क  विकून केलेल्या कमाईने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली.

बाहुबली सिरीजला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजामौलींच्या आगामी सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनचं या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. दक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं बजेट जवळपास 300 कोटीचं आहे. विशेष म्हणजे चुलबुली गर्ल आलिया भट या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

‘आरआरआर’ आलियाचा पहिला दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. त्याशिवाय ‘सिंघम’ अजय देवगणही या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा काल्पनिक असून 1920 मधील स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन पात्रांभोवती असणार आहे. राजामौली  ‘आरआरआर’ सिनेमा बाहुबलीपेक्षा मोठ्या स्केलवर करण्याच्या तयारीत आहेत. 30 जुलै 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासूनच ‘आरआरआर’ची चांगलीच चर्चा रंगत होती. आता बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’ कोणते नवे किर्तीमान प्रस्थापित करतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

‘हा’ महाराष्ट्र माझा नाही : केतकी चितळे

‘या’ चित्रपटातून शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं पदार्पण?

रणवीर सिंह रंगेबेरंगी कपडे का घालतो? उत्तर सापडलं!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *