Bigg Boss Marathi - 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

दिवसेंदिवस बिग बॉस सीझन 2 रंगत चालला आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातील पाणी वाचवा या टास्कमुळे शो चे सुत्रसंचालक महेश मांजरेकरांनी शेफ पराग कान्हेरेची अक्षरश: लाज काढली.

Bigg Boss Marathi - 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

मुंबई : दिवसेंदिवस बिग बॉस सीझन 2 रंगत चालला आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे. काल (16 जून) बिग बॉसच्या घरातील दुसरे एलिमिशेन पार पडेल. यात कोकणाचा माणूस अशी ओळख असणारे दिगंबर नाईक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले.  मात्र गेल्या आठवड्यातील पाणी वाचवा या टास्कमुळे शो चे सुत्रसंचालक महेश मांजरेकरांनी शेफ पराग कान्हेरेची अक्षरश: लाज काढली.

बिग बॉसच्या माध्यमातून अनेकदा समाजोपयोगी संदेश दिला जातो. त्यानुसार बिग बॉसने गेल्या आठवड्यात पाणी वाचवा हा संदेश देणाऱ्या टास्कचे आयोजन केले होते. बिग बॉसच्या घरात २४ तास पाणी पुरवठा होतो. परंतु, या परिस्थितीची प्रत्येक सदस्याला जाणीव असणे आवश्यक असल्याने आज घरात पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात येईल. यासाठी प्रत्येक सदस्याने घरातील पाणी जपून वापरावे असे सांगितले होते. हा टास्क दोन टीममध्ये रंगला होता. यात जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल असे बिग बॉसने सांगितले होते.

त्यानुसार बिग बॉसने घरातील सर्व पाणी स्टोअर रुममध्ये ठेवायला सांगितले. मात्र त्यानंतर अभिजीत बिचुकलेंनी ‘बिग बॉस मला तोंड धुण्यासाठी पाणी हवं आहे’. असे सांगत स्टोअर रुममध्ये धडक दिली. त्यांना इतर सदस्यांनी बिचुकलेंना ‘तुम्ही असे करु नका, बिग बॉस आपल्याला शिक्षा देतील’ असे सांगितले. मात्र त्यांनी कोणाचेही न ऐकता, जारमधले पाणी घेऊन तोंड धुतले. बिग बॉसने हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी बिचुकलेंना चांगलंच फैलावर घेतलं.

एकीकडे हा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे परागने सर्वाच्या नजरा चुकवत शौचालयात जाऊन जाणूनबुजून गव्हाचे पीठ टाकले. गव्हाचे पीठ टाकल्यामुळे समोरची टीम त्यांच्याकडे असलेले पाणी वापरेल आणि त्यांचे पाणी संपेल असे त्याला वाटेल. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यातून प्रेक्षकांसमोर आणि महेश मांजरेकरांसमोर उघडकीस आला.

पराग तू एक प्रसिद्ध शेफ आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. लोकांना खायला मिळत नाही आणि तू शौचालयात पीठ टाकलं. एखाद्या चपातीसाठी किंवा भाकरीसाठी लागणाऱ्या पीठाचा गैरवापर केलास. तुला हे करताना मनाला काही तरी वाटायला हवे होते. असे सांगत महेश मांजरेकरांनी परागला अक्षरश: लाज काढली.

नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या दुसऱ्या एलिमिशेन राऊंडमध्ये नेहा शितोळे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक, माधव देवचके, अभिजीत बिचुकले या सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले होते. त्यात अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये आले. त्यानंतर अखेर दिंगबर नाईक यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले.

तर दुसरीकडे शनिवारी (15 जून) कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी शिवानी सुर्वेला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले. मराठी बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे कुठल्या स्पर्धकाला पहिल्यांदाच घरातून हकलण्यात आलं आहे. शिवानीच्या जागी आता हिना पांचाळ हिची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *