Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi मुंबई : बिग बॉसच्या घरात  वादविवाद आणि गटबाजीला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेत्री वीण जगतापमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवानीने विनाला लाथ मारल्यामुळे त्या दोघीही अपात्र ठरल्या आहेत. या दोघींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. बिग बॉसच्या घरात आता वादाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. घरात आता टास्क रंगायला सुरुवात […]

सचिन पाटील

|

Jun 07, 2019 | 7:15 PM

Bigg Boss Marathi मुंबई : बिग बॉसच्या घरात  वादविवाद आणि गटबाजीला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेत्री वीण जगतापमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवानीने विनाला लाथ मारल्यामुळे त्या दोघीही अपात्र ठरल्या आहेत. या दोघींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

बिग बॉसच्या घरात आता वादाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. घरात आता टास्क रंगायला सुरुवात झाली असून टास्क दरम्यान घरातील शिलेदारांमध्ये खडाजंगी उडताना दिसत आहे. शिवानी- अभिजीत बिचुकले, वीणा-बाप्पा, शीव-पराग यांच्यामधील वाद गेल्या काही दिवसात चर्चेचा विषय ठरले. आता तर चोर-पोलीस या टास्क दरम्यान शिवानी आणि वीणामध्ये चक्क हातापायी झाली. शिवानीने वीणाला लाथ घातली.

हे यावरच थांबलं नाही. दोघींनी एकमेकींना तंबी आणि खुन्नस देत राहिल्या. एकमेकींना मारायची भाषा करणं या दोघींच्या आता चांगलचं अंगलट येणार असं दिसतंय. कारण बिग बॉस या दोघींच्या कृत्याने नाराज असून या दोघींना अपात्र ठरवणार असल्याचं म्हंटलं जात आहे. या दोघींच्या हिंसक कृत्याचं समर्थन केलं तर घरातील इतर सदस्यांना याने पट्टी फावेल म्हणून बिग बॉसनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.

आता बिग बॉसच्या खेळात हळू हळू रंग चढू लागला असून आगामी काळात अजून काय मसालेदार प्रेक्षकांना बघायला मिळतं हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें