Bigg Boss Marathi - 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi - 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

मुंबई : बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यापासूनच एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे शिवानी सुर्वे.. कधी आपल्या स्टाईलमुळे, तर कधी वादावादीमुळे चर्चेत आलेल्या शिवानीची मात्र नुकतंच बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवानीने घरातून बाहेर पडण्यासाठी गेल्या आठवड्यात चांगलाच तमाशा केला होता. त्याच रागात बिग बॉसने आज (15 जून) तिची हकालपट्टी केली आहे.

“बिग बॉसच्या घरातील भांडणांमुळे, राग अनावर होण्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे मला या घरात राहायचं नाही”, असं शिवानीने बिग बॉसला कॅमेऱ्यासमोर येत सांगितलं होतं. त्याशिवाय जर बिग बॉसनं माझं ऐकलं नाही, तर मी कायदेशीर कारवाई करेन अशी थेट धमकीही तिनं बिग बॉसला दिली होती.

मात्र त्यानंतर बिग बॉसने तिला झापल्यानंतर तिने घाबरत बिग बॉसची माफी मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शिवानी घरातील सदस्यांसोबत टास्क खेळतानाही दिसली. यामुळे प्रेक्षकांना तिचा घरातून बाहेर पडण्याचा प्लॅन बदलला असल्याचे वाटले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा तिने बिग बॉसकडे तिला घरातून बाहेर काढायची विनंती केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता बिग बॉसने तिची मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तपासणी केली. तिचे सर्व रिपोर्ट व्यवस्थित आले आणि डॉक्टरांनाही ती अगदी ठिकठाक असल्याचे सांगितले. त्यानंतर शिवानीला घरातील इतर सदस्यांनीही समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवानी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

मात्र आज अखेर आठवड्याच्या शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर  यांनी शिवानी सुर्वेला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले. मराठी बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे कुठल्या स्पर्धकाला पहिल्यांदाच घरातून हकलण्यात आलं आहे. शिवानीच्या जागी आता हिना पांचाळ हिची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *