Bigg Boss Marathi - 2 : माझ्यामुळे मेघा धाडे 'बिग बॉस' जिंकली : शिवानी सुर्वे

मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वाप्रमाणे दुसरा पर्वातही स्पर्धकांची भांडणे, वाद पाहायला मिळत आहेत. पहिल्या सीझनमध्ये बिग बॉस विजेती मेघा धाडे हिचं नाव पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होत. त्याचप्रमाणं यंदाच्या सीझनमध्ये देवयानी फेम शिवानी सुर्वे हिचे नाव गाजतयं. गेल्या काही दिवसांपासून स्टायलिश आउटफिट, अॅक्सेसरीज आणि शूज यामुळे चर्चेत असलेल्या शिवानीने …

Bigg Boss Marathi - 2 : माझ्यामुळे मेघा धाडे 'बिग बॉस' जिंकली : शिवानी सुर्वे

मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या पर्वाप्रमाणे दुसरा पर्वातही स्पर्धकांची भांडणे, वाद पाहायला मिळत आहेत. पहिल्या सीझनमध्ये बिग बॉस विजेती मेघा धाडे हिचं नाव पहिल्या दिवसापासूनच चर्चेत होत. त्याचप्रमाणं यंदाच्या सीझनमध्ये देवयानी फेम शिवानी सुर्वे हिचे नाव गाजतयं. गेल्या काही दिवसांपासून स्टायलिश आउटफिट, अॅक्सेसरीज आणि शूज यामुळे चर्चेत असलेल्या शिवानीने नुकतंच मेघा धाडेच्या विजयाचे श्रेय घेतलं आहे. “मेघाने बिग बॉसमध्ये विजयी होण्यापूर्वी माझ्याकडून टिप्स घेतल्याचं शिवानीने बिग बॉसच्या कार्यक्रमातील एन्ट्रीदरम्यान म्हटलं होतं”. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.

यंदा बिग बॉसच्या पर्वात वेगवेगळ्या धीटणीचे स्पर्धक प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. दुसऱ्या पर्वात अनेक ओळखीचे आणि प्रसिद्ध चेहरेही आहेत. यातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे देवयानी म्हणजे शिवानी सुर्वे. शिवानीही यंदाच्या बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉसमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी शिवानीने मेघा धाडेबद्दल एक अनोखा दावा केला होता.

माझ्यामुळे मेघा धाडे बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. मी तिला घरातील कपडे आणि स्टाईल याबाबत सल्ला दिला होता. त्यामुळे माझ्या मार्गदर्शनामुळेच मेघा बिग बॉसची विजेती झाली अस शिवानीने म्हटंल होतं.

यामुळे बिग बॉसच्या घरात एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. शिवानी आणि मेघा या दोघीही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. सोशल मीडियावरही या दोघींचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. यामुळे खरचं मेघाने शिवानीकडून अडवाईस घेतली होती की, शिवानी मेघाकडून सल्ला घेऊन बिग बॉसच्या घरात आली आहे, याबाबत चाहत्यांकडून साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.


शिवानी पहिल्या दिवसापासूनच स्वत:ला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आपली स्टाईल, लुक, आउटफिट, अॅक्सेसरीज आणि शूज यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये तिची फार चर्चा आहे. बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची मेघा विजेती ठरली होती आणि आता दुसऱ्या सीझनमध्ये शिवानीने प्रवेश केला आहे. या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहे. त्यामुळे मेघा धाडेप्रमाणे आता शिवानी बिग बॉस मराठीचं जेतेपद पटकावणार का आणि यात तिला मेघाची साथ मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *