‘या’ चित्रपटातून शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं पदार्पण?

बॉलिवूडमध्ये लवकरच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पदार्पण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 2 वर्षात अनेक बड्या कलाकारांच्या मुलांनी वेगवेगळ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

'या' चित्रपटातून शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं पदार्पण?

मुंबई : बॉलिवूडमध्ये लवकरच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पदार्पण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 2 वर्षात अनेक बड्या कलाकारांच्या मुलांनी वेगवेगळ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यामध्ये जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावं पहिली घेतली जातात. आता शाहरुख खानचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसत आहे. सोशल मीडियावरही आर्यनची मोठ्या संख्येने फॅन फॉलोविंग आहे.

शाहरुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार आर्यन आपले वडील शाहरुखसोबत चित्रपटात पदार्पण करणार असल्याचे समजत आहे. या चित्रपटाचे नाव ‘द लायन किंग’ आहे. पोस्टनुसार काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि आर्यन मुंबईतील एका रेकॉर्डिंग स्टुडिओ बाहरे एकत्र दिसले. शाहरुख खानची पत्नी गौरीही एकदा डबिंग सेशन दरम्यान स्टुडिओमध्ये आली होती.

शाहरुख आणि आर्यन हॉलिवूड मुव्ही ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी डबिंग करत आहेत. मात्र याबाबत अजून दुजोरा मिळालेला नाही. शाहरुखने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलासोबत फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघांनी भारतीय क्रिकेट संघाचे टीशर्ट घातले आहे. शाहरुखच्या टी-शर्टवर मुसाफा (लायन किंगचे नाव) आणि आर्यनच्या टी-शर्टवर सिंबा (छोठा लायन) लिहिलं आहे.

काहीमहिन्यांपूर्वी चर्चा होती की, आर्यन खान दिग्दर्शक करण जोहरच्या तख्त चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Published On - 7:31 pm, Sun, 16 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI