AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Murder : ज्या हत्यारांनी शरीराचे तुकडे केले ती हत्यारं कुठंयत? आफताबने सांगून टाकलं!

चॉपर, करवत आणि ब्लेड! हत्येसाठी वापरलेली ही शस्त्र सापडली तर हत्येचं गूढ लवकरच उलगडेल!

Shraddha Murder : ज्या हत्यारांनी शरीराचे तुकडे केले ती हत्यारं कुठंयत? आफताबने सांगून टाकलं!
पोलीस तपास सुरुच..Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Nov 22, 2022 | 9:57 AM
Share

नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांड (Shraddha Murder News) प्रकरणी पोलिसांनी महत्त्वपूर्ण माहिती मिळालीय. श्रद्धाची हत्या (Murder mystery) करण्यासाठी वापरलेली हत्यारं आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने नेमकी कुठे फेकली, याचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस घेत होता. अखेर याबाबत आफताब पुनावाला यानेच पोलिसांना महत्त्वाची माहिती दिलीय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने गुरुग्राममध्ये एका झाडीत श्रद्धाची हत्या करण्यासाठी वापरलेली करवत, चॉपर आणि ब्लेड फेकले असल्याचं म्हटलंय. महरौली येथे 100 फूट अंतरावर असलेल्या एका कचऱ्याच्या डब्यात त्याने या गोष्टी फेकल्या.

दरम्यान, दिल्ली पोलिसांचं पथक याआधी दोन वेळा गुरुग्राम येथील झाडीत शोध घेऊन झालंय. 18 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी याच झाडीत तपास केला. दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीनेही शोध घेतला. पण पोलिसांना काहीच आढळून आलं नव्हतं.

दिल्ली पोलिसांना महरौली जंगलात एक जबडा आणि काही हाडांचे अवशेष सापडले होते. दिल्ली पोलिसांनी हे अवशेष फॉरेन्सिक आणि डेन्टिन्स्ट पथकाकडे तपासणी पाठवलेत. हे अवशेष श्रद्धाचेच आहेत की आणखी कुणाचे, याचा तपास केला जातोय.

दुसरीकडे आफताब याने श्रद्धचं डोकं आणि शरीराचा काही भाग मैदानगडी येथील तलावात फेकल्याचं म्हटलं. त्यामुळे आता पोलिसांनी या तलावातही शोधकार्य सुरु केलंय. श्रद्धाचं डोकं अद्याप आढळलं नसल्यानं पोलिसांच्या तपासातील आव्हानं दिवसेंदिवस वाढत चाललीयत.

जो जबडा पोलिसांना आढळून आला होता, त्याच्या मदतीनं डेन्स्टिस्टकडे जाऊन पडताळणी करण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. मुंबईत श्रद्धा वालकर हीने रुट कॅनल केलं होतं. तेव्हाचा एक्स-रे रिपोर्ट मिळाल्यानंतरच ही पडताळणी केली जाऊ शकते, असं डेन्स्टिन्टने पोलिसांनी सांगितलं. एक्स-रे रिपोर्टशिवाय तो जबडा नेमका कुणाचा आहे, हे सांगणं कठीण आहे, असंही जाणकारांचं म्हणणंय.

दिलासादायक बाब म्हणजे दिल्ली पोलिसांना आफताबची पॉलिग्राफ टेस्ट करण्यास कोर्टाकडून परवानगी मिळालीय. तसंच आज आफताब पुनावाला याची पोलीस कोठडी संपतेय. या कोठडीत वाढ करण्याची मागणीदेखील पोलिसांकडून आज केली जाण्याची शक्यताय.

सोमवारी खरंतर आफताब याची नार्को टेस्ट केली जाणार होती. पण नार्को टेस्ट आधी पॉलिग्राफ टेस्ट करावी लागणार आहे. विशेष म्हणजे आफताबही पॉलिग्राफ टेस्ट करण्यास तयार असल्याचं समोर आलंय.

मागच्या गुरुवारी पोलिसांनी नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली होती. ही परवानगी कोर्टाकडून देण्यातही आलेली. मात्र आता त्याआधी होणाऱ्या पॉलिग्राफ टेस्टकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 11 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. त्यातील दोघांनी श्रद्धाची मदत केली होती. 2020 साली झालेल्या मारहाणीनंतर श्रद्धाच्या दोन जवळच्या व्यक्तींचेही जबाब पोलिसांनी नोंदवलेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...