
इंदौरमधील विवाहित जोडपं राजा रघुवंशी आणि सोनम यांची कहाणी सोमवारी पूर्णपणे बदलली. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सात दिवसांनी सोनम रघुवंशी समोर आली आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पोलिसांसमोर शरण आली. पोलिसांचं म्हणणं आहे की, सोनमने सुपारी देऊन खुनींना भाड्याने बोलावलं आणि आपल्या पती राजाच्या हत्येचा कट रचला. या कटात तिचा प्रियकर राज कुशवाहा याचाही समावेश होता. आतापर्यंत सोनमला पीडित समजलं जात होतं, पण आता तीच या संपूर्ण कटाची खरी सूत्रधार निघाली आहे.
दुसरीकडे, सोनमच्या वडिलांनी कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या आरोपांना खोटं ठरवलं आणि दावा केला की त्यांची मुलगी निर्दोष आहे. त्यांचं म्हणणं आहे की सोनमला फसवलं जात आहे. तर, राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने दावा केला आहे की, सोनमने शरणागती पत्करली नाही, तर कुटुंबाला कॉल आल्यानंतर त्यांनी पोलिसांना तिची माहिती दिली. अचानक बदललेल्या या घटनांनी या प्रकरणाला एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखं बनवलं आहे. दरम्यान, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वाचा: सोनम खूनी नाही? भावाच्या वक्तव्याने खळबळ, राजा रघुवंशी प्रकरणात मोठा ट्विस्ट!
हत्येचे प्लानिंग कसे केले
अमर उजालाच्या एका अहवालानुसार, राजा रघुवंशी याची हत्या त्याची पत्नी सोनमच्या समोरच झाली होती. अहवालात मेघालय पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, राजा रघुवंशी याच्या हत्येची ही संपूर्ण स्क्रिप्ट सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी मिळून रचली होती. हा कट असा होता की, कोणालाच याची भनक लागू नये की हे काम त्यांनी केलं आहे.
11 मे रोजी जेव्हा सोनम आणि राजाचं लग्न झालं तेव्हा दोन्ही कुटुंबं आनंदी होती, कोणालाच कल्पना नव्हती की हा आनंद लवकरच शोकात बदलणार आहे. सोनमचं वागणं असं होतं, जसं की ती या कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखते. तिने आपल्यावर संशय येण्याची कोणतीही शक्यता ठेवली नव्हती. घरातून लग्नाचे पाहुणे निघून गेल्यावर, सोनमने पाच दिवसांनंतर राजाला मारण्याचा कट रचला.
एक किलोमीटर लांब खुनींचे राहणे
कटानुसार, राज इंदौरमध्येच राहिला. सोनम, विशाल, आकाश आणि आनंद शिलाँगला गेले. सोनमने सर्वांना वेगवेगळं आणि तिच्या होम स्टेपासून दूर राहण्यास सांगितलं. त्यामुळे, आरोपी शिलाँगमध्ये सोनम आणि राजाच्या होम स्टेपासून सुमारे 1 किलोमीटर दूर असलेल्या हॉटेलमध्ये राहिले. सोनमकडे या सर्व आरोपींचे फोन नंबर होते.
पोलिसांचं म्हणणं आहे की, सोनम जिथे जिथे जायची, ती आरोपींना तिचं लोकेशन पाठवायची. यामुळे आरोपींना राजापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. 23 मे रोजी सोनम राजाला कोरसा या डोंगरी भागात घेऊन गेली. तिने फोटो शूटचं निमित्त केलं. रस्त्यात आणखी तीन लोक राजाला भेटले. ते सर्व एकत्र चालू लागले. आरोपींनी मेघालय पोलिसांना सांगितलं की, यावेळी सोनम थकल्याचं नाटक करत होती आणि हळूहळू मागे राहिली. डोंगर चढताना आरोपी थकले. त्यांनी हत्या करण्यास नकार दिला. सोनमला तिचा प्लान फेल होत असल्याचे वाटले. तिने आरोपींना पैशाचे आमिश दाखवले. त्यानंतर डोंगरावरुन स्वत: राजाला धकलून दिले.