Raja Raghuvanshi murder case: सोनम खूनी नाही? भावाच्या वक्तव्याने खळबळ, राजा रघुवंशी प्रकरणात मोठा ट्विस्ट!
राजा सूर्यवंशी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राजाच्या भावाने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांना धक्काच बसला आहे. आता नेमकं काय झालं जाणून घ्या...

मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक केली आहे. राजाचा मृतदेह मेघालयातील शिलाँग येथे सापडला होता. मेघालय पोलिसांचा दावा आहे की राजा खून प्रकरणाची मास्टरमाइंड सोनम रघुवंशीच आहे. पण पोलिसांच्या या दाव्याशी राजाचे भाऊ विपिन रघुवंशी पूर्णपणे सहमत नाहीत. या संपूर्ण प्रकरणावर राजाचे भाऊ विपिन रघुवंशी म्हणाले की, मेघालयचे डीजीपी सांगत आहेत की सोनम खूनी आहे, पण अद्याप तिच्याशी नीट चौकशीही झालेली नाही. अशी अफवा पसरवली जात आहे की सोनमने शरणागती पत्करली. पण खरं सत्य हे आहे की आम्हीच पोलिसांना येथून माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तिला पकडलं.
सोनमची अटक गाझीपूरमधील एका ढाब्यावरून झाली. ढाब्याच्या मालकाने सांगितलं की, सोनमने त्याच्याकडे मोबाइल मागितला आणि घरी तिच्या भावाला फोन केला. त्यानंतर पोलिस ढाब्यावर पोहोचले आणि तिला अटक केली. राजा रघुवंशीचे भाऊ विपिन रघुवंशी म्हणाले की, काल सोनमने गोविंद (भाऊ) ला फोन केला होता. ती म्हणाली, ‘मी बिट्टी बोलत आहे भैया.’ तेव्हा गोविंदने तिला सांगितलं, ‘आधी तुझा चेहरा दाखव, तू कोण आहेस?’ त्यानंतर सोनमने गाझीपूरमधूनच व्हिडिओ कॉल केला.
राजाचे भाऊ विपिन रघुवंशी म्हणाले- सोनमने शरणागती पत्करली नाही
विपिन रघुवंशी म्हणाले की, व्हिडिओ कॉलनंतर जेव्हा खात्री झाली की ती सोनमच आहे, तेव्हा आम्ही यूपी पोलिसांना फोन केला आणि ते तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी सोनमला आपल्यासोबत नेलं. ती तिथेच बसली होती. तिने शरणागती पत्करली नाही. या सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. डीजीपी सांगत आहेत की ती खूनी आहे, पण अद्याप सोनमची नीट चौकशीही झालेली नाही.
विपिन रघुवंशी यांच्या मते, या प्रकरणात सोनम व्यतिरिक्त आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना सोनमसमोर आणावं लागेल. जोपर्यंत हे तिन्ही आरोपी सोनमसमोर बोलत नाहीत, तोपर्यंत सोनमला खूनी मानण्यास तयार नाही. लग्नानंतर राजा आणि सोनम यांच्यात कोणताही वाद झाला नव्हता. दोघेही सुखाने राहत होते. या संपूर्ण प्रकरणात अफवा पसरवू नयेत. आम्हीच पोलिसांना सोनमच्या ठिकाणी पाठवलं होतं. आम्ही स्वतः पोलिस स्टेशनला जाऊन संपूर्ण प्रकरणाची खात्री करू. राजा आणि सोनमचं लग्न अरेंज मॅरेज होतं. चार महिन्यांपूर्वीच दोघांची भेट झाली होती.
‘राजाशी कोणाशीही वैर नव्हतं’
विपिन रघुवंशी म्हणाले की, राजाची कोणाशीही वैर नव्हतं. आम्हाला या प्रकरणाची सीबीआय चौकशी हवी आहे. आम्ही सोनमला भेटू आणि तिच्याकडून संपूर्ण प्रकरणाबाबत विचारपूस करू. सगळ्या गोष्टी सोनमच स्पष्ट करेल. जर ती दोषी आढळली तर तिला शिक्षा मिळायला हवी.
याच वर्षी 11 मे रोजी सोनम आणि राजाचं लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही मेघालयातील शिलॉंग येथे हनीमूनसाठी गेले होते. याच ठिकाणी राजाचा खून झाला. पोलिसांनी या प्रकरणात सोनम व्यतिरिक्त आणखी तीन आरोपींना अटक केली आहे.