AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीसाठी हिटर चालू करुन झोपला, पण अखेर वातावरण एवढे गरम झाले की त्याने…

पानिपत शहरातील हायप्रोफाईल परिसर अंसल येथे हे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये जॉनी हा सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. सध्या हिवाळा सुरु असल्याने सकाळी प्रचंड थंडी लागत असल्याने जॉनीने स्पा सेंटरमधील हिटर सुरु केला आणि झोपी गेला.

थंडीसाठी हिटर चालू करुन झोपला, पण अखेर वातावरण एवढे गरम झाले की त्याने...
कानपूरमध्ये मुलाने आईच्या प्रियकराला संपवलेImage Credit source: TV9 Marathi
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jan 05, 2023 | 7:20 PM
Share

पानिपत : थंडी लागली म्हणून हिटर लावून झोपलेल्या स्पा सेंटरमधील सफाई कर्मचाऱ्याचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. मात्र मयताच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. जॉनी असे मयत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळाची तपासणी केली असता हा अपघाती मृत्यू असल्याचे दिसते. मात्र पोलीस अधिक तपास करत आहेत.

स्पा सेंटरमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा

पानिपत शहरातील हायप्रोफाईल परिसर अंसल येथे हे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये जॉनी हा सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे जॉनी गुरुवारी स्पा सेंटरमध्ये आपल्या ड्युटीवर गेला होता.

थंडी होती म्हणून हिटर सुरु केला

सध्या हिवाळा सुरु असल्याने सकाळी प्रचंड थंडी लागत असल्याने जॉनीने स्पा सेंटरमधील हिटर सुरु केला आणि झोपी गेला. हिटरमुळे जवळच असलेल्या सोफ्याला आग लागली. आगीमुळे स्पा सेंटरमध्ये सर्वत्र धूर पसरला.

धुरामुळे जॉनीचा श्वास गुदमरला. झोपेत असल्याने त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी बाहेर पडता आले नाही. यामुळे घुसमटल्याने त्याचा दुर्दैवी मृ्त्यू झाला.

कुटुंबीयांकडून हत्येचा आरोप

जॉनीचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता आतमधील बरेचसे सामान जळालेले दिसले. यावरुन जॉनीचा मृत्यू श्वास घुसमटल्यामुळेच झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...