एसटी चालकाला लक्झरी चालकाची बेदम मारहाण, अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

Buldhana news : गाड्या मोठ्या असल्यामुळे एकमेकाला साईट देण्याच्या कारणावरुन भांडणं सुरु झालं. एसटी चालकाला लक्झरी चालकाने बेदम मारहाण केली.

एसटी चालकाला लक्झरी चालकाची बेदम मारहाण, अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
MSRTCImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 7:33 AM

गणेश सोळंकी, बुलढाणा : शेगाव (Shegaon) येथून यवतमाळ (yavatmal) येथे जात असताना शेगाव आगाराच्या बस चालकाला साईट देण्याच्या कारणावरून खामगाव (khamgaon) येथील स्वामी ट्रॅव्हल्सच्या खाजगी बस चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना शेगाव बाळापुर दरम्यान घडली आहे. खाजगी बस चालकाने एसटी बस चालकाला इतकी मारहाण केली, की एसटी बस चालकाचा एका डोळ्याला आणि मेंदूला मार लागलेला आहे. त्यामुळे गंभीर जखमी एसटी बस चालकाला अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी लक्झरी बस चालकावर व वाहकावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहे.

नेमकं काय झालंय

एप्रिल आणि मे महिन्यात सुट्टीमुळं अनेकजण गावाकडं जात असतात, सध्या एसटी आणि ट्रॅव्हल्स गाडीला अधिक गर्दी असल्याचं पाहायला मिळतं आहे. लोकांना रोज गावाला सोडणं आणि घेऊन जाण्याचं काम दोन्ही गाड्या करत आहेत. एसटीचे दर कमी असल्यामुळे लोकांचा अधिक एसटीकडे कल असतो. त्यामुळे अनेकदा लक्झरी चालक मुद्दाम भांडण काढतात असं पाहायला मिळालं आहे. काल जो प्रकार झालाय, तो सुध्दा त्यातून झाला असावा अशी सगळीकडं चर्चा आहे.

गाड्या मोठ्या असल्यामुळे एकमेकाला साईट देण्याच्या कारणावरुन भांडणं सुरु झालं. एसटी चालकाला लक्झरी चालकाने बेदम मारहाण केली. एसटी चालकाच्या डोळ्याला आणि मेंदूला जबर मारहाण झाल्यामुळे अकोला येथील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केलं आहे. पोलिसांनी लक्झरी चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लवकरचं त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.