Nandurbar : रॉयल व्हिस्किचा साठा धुळ्यातच पकडला, महाराष्ट्रातून गुजरातला होणार होती बेकायदा वाहतूक

| Updated on: Jul 02, 2022 | 10:53 AM

पर राज्यातून महाराष्ट्र मार्गे गुजरातमध्ये अवैध मद्य साठा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून या दारूच्या कंटेनर कारवाई केली. मात्र, कंटेनरवर कारवाई होत असल्याचा अंदाज चालकाला लागताच, त्याने पळ काढला असून पुढील तपास नंदुरबार पोलिस करत आहेत.

Nandurbar : रॉयल व्हिस्किचा साठा धुळ्यातच पकडला, महाराष्ट्रातून गुजरातला होणार होती बेकायदा वाहतूक
Image Credit source: tv9
Follow us on

नंदूरबार : महाराष्ट्रातून (Maharashtra) गुजरातकडे अवैधरित्या जाणारा दारू साठा नंदुरबार पोलिसांनी जप्त केला आहे. गुजरातकडे अवैधरित्या दारू साठा जात असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. यावेळी पथकाने धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील (National Highways) अ‌ॅपल हॉटेल समोर साक्रीहुन सुरतकडे जाणाऱ्या कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये अवैधरीत्या वाहतूक (Illegal transportation) होणारी 43 लाखांची विदेशी बनावट दारू मिळून आली. या कारवाईत कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली असता धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर क्रमांक जी.जे.06 ए.झेड.3560 मध्ये विदेशी बनावटची राँयल विस्की दारुची वाहतूक गुजरात राज्यात होत असल्याची माहिती मिळाली होती. या कंटेनरचे तपासणी केली असता रॉयल विस्की बॉटलचे बॉक्स मोठ्या प्रमाणात आढळून असून जवळपास 43 लाखांचा अवैध मद्य साठा जप्त करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

पर राज्यातून महाराष्ट्र मार्गे गुजरातमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक

पर राज्यातून महाराष्ट्र मार्गे गुजरातमध्ये अवैध मद्य साठा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून या दारूच्या कंटेनर कारवाई केली. मात्र, कंटेनरवर कारवाई होत असल्याचा अंदाज चालकाला लागताच, त्याने पळ काढला असून पुढील तपास नंदुरबार पोलिस करत आहेत. तसेच कंटेनरच्या चालकाचा शोध देखील पोलिसांनी घेण्यास सुरूवात केल्याचे कळते आहे.