Sangli Murder : सांगलीत लहान भावाकडून तरुणाची हत्या, दारु पिऊन शिवीगाळ करायचा म्हणून संपवले

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत नातेवाईकांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सत्य सांगितले. विनोदनेच नारळ सोलण्याची मशिन डोक्यात घालून अर्जुनची हत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. यानंतर विनोदची आई अलका पवार हिने याबाबत फिर्याद दाखल केली.

Sangli Murder : सांगलीत लहान भावाकडून तरुणाची हत्या, दारु पिऊन शिवीगाळ करायचा म्हणून संपवले
सांगलीत लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 11:56 PM

सांगली : मोठा भाऊ दररोज दारु (Alcohol) पिऊन शिवीगाळ (Abusing) करायचा म्हणून लहान भावाने डोक्यात नारळ सोलण्याची मशिन घालून त्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी येथे धक्कादायक घटना घडली आहे. वैभव अर्जून पवार (38) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर विनोद अर्जुन पवार (24) असे हत्या करणाऱ्या आरोपी भावाचे नाव आहे. भावाची हत्या करुन अपघाती मृत्यूचा बनाव केला. याप्रकरणी विटा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली. विटा पोलिसांनी मोठ्या शिताफीने हत्येचा छडा लावत आरोपीला अटक केले.

हत्या करुन अपघाती मृत्यूचा बनाव

मयत अर्जुन पवार हा दररोज घरी दारु पिऊन येत असे. दारुच्या नशेत तो शिवीगाळ करायचा. याचाच राग विनोदच्या मनात खदखदत होता. याच रागातून त्याने अर्जुनच्या डोक्यात नारळ सोलण्याची मशिन घातली. यात अर्जुनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विनोदने त्याला रुग्णालयात नेत चक्कर येऊन पडल्याचा बनाव केला. चक्कर येऊन दगडावर आपटल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगत विनोदने डॉक्टर आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना त्याचा संशय आला.

नातेवाईकांची चौकशी केली असता गुन्हा उघडकीस

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत नातेवाईकांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सत्य सांगितले. विनोदनेच नारळ सोलण्याची मशिन डोक्यात घालून अर्जुनची हत्या केल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. यानंतर विनोदची आई अलका पवार हिने याबाबत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत विनोदला अटक केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम व त्यांच्या पथकाने भेट दिली असून, अधिक तपास पोलीस निरिक्षक संतोष डोके हे करीत आहेत. (A young man was killed by his younger brother after drinking alcohol and abusing in Sangli)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.