Crime News | पूजा शर्माच्या सांगण्यावरुन ‘तो’ न्यूड झाला, आणि मग….

Crime News | शरीरसुख मिळवण्याच्या नादात तो फसत गेला. सावज आपल्या जाळ्यात अडकलय हे लक्षात आल्यानंतर पूजा शर्माने त्याला व्हॉट्स अपवरुन व्हिडिओ कॉल केला.

Crime News | पूजा शर्माच्या सांगण्यावरुन तो न्यूड झाला, आणि मग....
Man catch in trap of women
| Updated on: Dec 21, 2023 | 12:29 PM

सूरत : हिरे कंपनीत नोकरी करणाऱ्या एका 32 वर्षीय व्यक्तीला अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करण चांगलच महाग पडलय. 13 ऑगस्टला या व्यक्तीला त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. पूजा शर्मा नावाच्या महिलेने ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर दोघांनी एफबीवर चॅटिंग सुरु केली. दोघांनी परस्परांना फोन नंबर दिले. तिथेच घात झाला. पूजा शर्माने या व्यक्तीला अलगद जाळ्यात अडकवलं. शरीरसुख मिळवण्याच्या नादात पीडित व्यक्तीने चूक केली. ज्याची त्याला जबर किंमत मोजावी लागली.

सावज आपल्या जाळ्यात अडकलय हे लक्षात आल्यानंतर पूजा शर्माने त्याला व्हॉट्स अपवरुन व्हिडिओ कॉल केला. त्याला गोडीगुलाबीने बोलण्यामध्ये गुंतवल. सावज पूर्णपणे अडकलय हे लक्षात आल्यानंतर तिने त्याला न्यूड होण्यास सांगितलं. तिच्या ट्रीकमध्ये फसल्यानंतर पीडित व्यक्तीचा बराच खिसा रिकामा झाला. आता पैसे देऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्याने सूरत सायबर क्राइम पोलीस स्थानकात धाव घेतली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

न्यूड होताच कॉल डिसकनेक्ट

या प्रकरणात महिला आधी विवस्त्र झाली. त्यानंतर तिने पीडित व्यक्तीला बाथरुरममध्ये जाऊन न्यूड होण्यास सांगितलं. एकदा ती व्यक्ती न्यूड होताच तिने लगेच कॉल डिसकनेक्ट केला. काही वेळाने पीडित व्यक्तीला अज्ञात नंबरवरुन एक मेसेज आला. त्यात त्याचा न्यूड व्हिडिओ होता. थोड्यावेळाने त्याला फोन आला. फोन करणाऱ्याने त्याला पैशासाठी धमकावलं.

स्वत:ची ओळख DSP सुनील दुबे अशी सांगितली

14 ऑगस्टला पोलीस युनिफॉर्ममधील एका व्यक्तीने त्याला व्हिडिओ कॉल केला. त्याने स्वत:ची ओळख DSP सुनील दुबे अशी करुन दिली. त्याने संजय सिंघानिया नावाच्या बनावट युट्यूब अधिकाऱ्याबरोबर त्याला बोलायला लावलं. व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली.

किती लाख दिले

या मागण्या मान्य करुन त्याने वेगवेगळ्यावेळी 5.65 लाख रुपये ट्रान्सफर केले. अजून पैशांसाठी त्याला सतत धमक्या मिळत होत्या. अखेर पीडित व्यक्तीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. सर्व आरोपींविरोधात IPC च्या 384, 170, 171, 507, 120 ब कलमातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.