AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री तिला हळद लागली आणि लग्नाच्या दिवशीच वधूने उचललं टोकाचं पाऊल.. लग्न मोडायच्या भीतीने संपवलं आयुष्य

तिच्या हातावर मेहंदी लागली होती, रात्री उत्साहात हळदीचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी लग्न म्हणून सगळे पटापट झोपायला गेले. मात्र पहाटे एका मोठ्या किंकाळीने लग्नघराला जाग आली. समोरचं दृश्य बघून सर्वांचेच डोळे विस्फारले. जिच्या लग्नाची घरात लगबग सुरू होती, तीच समोर निचेष्ट अवस्थेत पडल्याचे पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

रात्री तिला हळद लागली आणि लग्नाच्या दिवशीच वधूने उचललं टोकाचं पाऊल.. लग्न मोडायच्या भीतीने संपवलं आयुष्य
| Updated on: Dec 21, 2023 | 12:10 PM
Share

सोलापूर| 21 डिसेंबर 2023 : तिच्या हातावर मेहंदी लागली होती, रात्री उत्साहात हळदीचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी लग्न म्हणून सगळे पटापट झोपायला गेले. मात्र पहाटे एका मोठ्या किंकाळीने लग्नघराला जाग आली. समोरचं दृश्य बघून सर्वांचेच डोळे विस्फारले. जिच्या लग्नाची घरात लगबग सुरू होती, तीच समोर निचेष्ट अवस्थेत पडल्याचे पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

लग्नाच्या दिवशीत होणाऱ्या वधूने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याने एकच खळबळ माजली. ज्या घरात रात्रीपर्यंत आनंदाचं, हसतंखेळतं वातावरण होतं, त्याच घरात शोककळा पसरली. सालिया शेख असं मृत तरूणीचं नाव आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला अश्लील फोटो पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. लग्न मोडेल आणि बदनामी होईल या भीतीपोटीच सरळ स्वभावाच्या सालियाने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा ध्कका

काय आहे प्रकरण ?

सालिया हिचं लग्न ठरलं होतं, मात्र एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने त्याच्या मित्रांसोबत तिला प्रचंड त्रास दिल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. त्या तरूणाने त्याच्या मित्रांना सोबत घेत सालेहाचे लग्न तोडण्याची धमकी दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

सालिया हिने विजापूर नाका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. एकतर्फी प्रेम प्रकरणात त्रास होत असल्याची लेखी तक्रारही तिने दाखल केली होती. तीन संशयितांचे नावे देखील तिने लेखी तक्रारीत नमूद केली होती. मात्र धमकीचे प्रकार न थांबल्याने अखेर हे पाऊल तिने उचलले.

सालियावर एक तरूणाचे प्रेम होते, मात्र तिचे लग्न ठरल्याचे समजताच त्याने तिला त्रास देण्यास, धमकी देण्यास सुरूवात केली. त्याने तिच्या होणाऱ्या पतीलाही फोन करून धमकी दिली. तसेच अश्लील फोटो WhatsApp च्या माध्यमातून वधूच्या होणाऱ्या पतीलाही पाठवले होते.

तुझे लग्न मोडू, अशी धमकी त्या तरूणांनी सालियाला दिली. भर लग्नात येऊन गोंधळ करतील,आई-वडिलांच्या इज्जतीवर प्रश्न उपस्थित होतील. वर आणि वऱ्हाड मंडळी लग्न कार्य न करताच परत जातील. ठरलेले लग्न मोडेल, अशी भीती तिच्या मनात होती. हळद लावून सगळे नातेवाईक झोपायला गेले आणि घाबरलेल्या सालियाने लग्नाच्या दिवशी पहाटेच टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले.

तिची आई पहाटे तिला उठवायला खोलीत गेली, तेव्हा लेक फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. हे पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. होणाऱ्या वधूच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतापाचे वातावरण आहे. त्या होणाऱ्या वधूचे वडील व इतर नातेवाईक शासकीय रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत. जोपर्यंत संशयित आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

solapur, crime news, bride, ende life, blackmailing

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.