
Swami Chaitanyanand: दिल्ली येथील वसंत कुंज येथे श्री शारदा इंस्टीट्यूट मॅनेजमेंट (Sri Sharada Institute of Indian Management) आहे. या इंस्टीट्यूटचा स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर येथील 17 विद्यार्थिनींवर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याते आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. तपास पुढे सरकत आहे तसं बाबाने केलेली नको ती कृत्य समोर येत आहेत. बाबाने फक्त मुलींचा लैंगिक छळ केला नाही तर, संस्थेच ‘लेडी गँग’ देखील तयार केली होती. बाबाच्या गँगमधील महिला मुलींना बळजबरी बाबाच्या खोळीत पाठवाच्या… आणि बाबाने पाठवलेले अश्लिम मेसेज देखील डिलिट करायच्या…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाच्या या लेडी गँगमध्ये तीन महिला वॉर्डन सामिल होत्या. ज्यांना नोटिस पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलं. एफआयआरमध्ये या तीन महिला देखील सह-आरोपी आहेत. मुलींना सांगितल्यानुसार, या वॉर्डनने त्यांना केवळ बाबांकडे पाठवलं नाही तर त्यांच्या मोबाईल फोनमधून आक्षेपार्ह चॅट्स आणि मेसेजेस डिलीट करण्यास देखील भाग पाडलं.
पीडितांच्या जबाबात स्पष्टपणे म्हटलं आहे की, संस्थेतील महिला प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आरोपींच्या मागण्या पूर्ण करण्यास उद्युक्त केलं. ज्यांनी विरोध केला त्यांना परीक्षेत नापास करण्याची किंवा शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी देण्यात आली.
पोलिस सूत्रांनुसार, ज्या मुली EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) कोट्यातून प्रवेश मिळाला होता. त्याच मुलींचा शिकार बाबा करत असे… या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि बाबाने त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतला. पीडितांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे की, बाबा त्यांना परदेश दौऱ्यांचे आश्वासन देऊन आमिष दाखवत असत, परंतु जर त्यांनी नकार दिला तर त्यांना परीक्षेत नापास करण्याची धमकी देत असत.
तपासा दरम्यान आतापर्यंत 31 विद्यार्थिनींनीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ज्यामध्ये सतरा विद्यार्थिनींनी दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितले की, बाबा त्यांना शिवीगाळ करायचा, अश्लील मेसेज पाठवायचा आणि अनुचित वर्तन करण्याचा प्रयत्न करायचा. शिवाय, विद्यार्थिनींनी असं सांगितलं की, संस्थेच्या तीन महिला वॉर्डन त्यांना जबरदस्तीने बाबांच्या खोलीत घेऊन जात होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, FIR दाखल झाल्यानंतर चैतन्यानंद फरार आहे. दिल्ली पोलिसांनी बाबाला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाची अंतिम लोकेशन आग्रा होती. पण अटक होण्याच्या भीतीने बाबा सतत स्वतःचं ठिकाण बदलत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.