जया बच्चन यांनी अभिनेत्याला बेदम मारलं तेव्हा… म्हणाला, ‘त्यांचा राग म्हणजे…’
Jaya Bachchan : सिनेमाच्या सेटवर जया बच्चन यांनी अभिनेत्याला काठीने बेदम मारलं तेव्हा..., अनेक वर्षांनंतर अभिनेता म्हणाला, 'त्यांचा राग म्हणजे...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा...

Jaya Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांचे व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये त्या कायम रागात दिसतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याने जया बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, भोजपुरी सिनेमात देखील काम केलं आहे. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगा देवी’ सिनेमात दोघांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर सिनेमात भोजपुरी इंडस्ट्रीचे सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी देखील भुमिका साकारली होती. सिनेमातील काही किस्से निरहुआ यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले आहेत. जेव्हा निरहुआ यांनी जया बच्चन यांच्या रागाचा सामना केला होता.
जया बच्चन यांनी निरहुआ यांना मारलं होतं…
नुकताच झालेल्या मुलाखतीत निरहुआ यांनी मोठा खुलासा केला आहे. सिनेमाच्या सेटवर अमिताभ बच्चन कामय सर्वांना हसवायचे, गंमत करायचे… त्यांच्यामुळे सेटवरील वातावरण हसतं-खेळतं होतं. पण जया बच्चन प्रचंड रागीट आहेत. एकदा, शूटिंग करताना, त्याने निरहुआला काठीने मारलं. निरहुआ म्हणाले, ‘एक सीन होता ज्यामध्ये मला माझ्या पत्नीला ओरडायचं होतं आणि मारायचं होतं… त्यानंतर जया बच्चन यांनी देखील मला मारलं आणि खरंच काठीने प्रचंड मारलं… मी विचारलं का मारलं, तेव्हा त्या म्हणाल्या तू माझ्या सूने का मारलंस… त्या प्रचंड रागीट आहेत… त्यांनी मला दोन – तीन वेळा काठीने मारलं…
पुढे निरहुआ म्हणाले, ‘त्यांनी मला दिलेला मार देखील मी प्रसाद समजला.. कारण जया बच्चन आणि अमिताभ बच्चन माझ्यासाठी देव स्वरुप आहेत… किती असे कलाकार आहेत, ज्यांना जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असेल?’
‘जेव्हा मला कळलं की मला जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचं आहे, तेव्हा मी हैराण झालो… माझ्यासाठी ते एक स्वप्न होतं जे सत्याय उतरलं होतं… जया बच्चन आणि अमिताभ बच्चन माझ्यासाठी देवासारखे आहेत… त्यांना समोर पाहिल्यानंतर मला कळलं नाही काय बोलू, कसं बोलू… पण बिग बी यांना माझ्या मनातील भावना कळल्या आणि त्यांनी माझ्यासमोर मजेशीर वातावरण निर्माण केलं…’ असं देखील निरहुआ म्हणाले. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी फक्त बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नाही तर, भोजपुरी सिनेमात देखील काम केलं आहे. ‘गंगा देवी’, ‘गंगा’ आणि ‘गंगोत्री’ सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं.
