आम्हाला स्पर्श केला, अश्लील मेसेज पाठवले आणि…, मॅनेजमेंट कॉलेजच्या 17 विद्यार्थिनींकडून बाबाची पोलखोल

Swami Chaitanyanand: आम्हाला स्पर्श केला, अश्लील मेसेज पाठवले, बळजबरी खोलीत पाठवलं आणि..., बाबाच्या काळ्या कृत्यांचीमॅनेजमेंट कॉलेजच्या 17 विद्यार्थिनींकडून पोलखोल... बाबा फरार....

आम्हाला स्पर्श केला, अश्लील मेसेज पाठवले आणि..., मॅनेजमेंट कॉलेजच्या 17 विद्यार्थिनींकडून बाबाची पोलखोल
Updated on: Sep 25, 2025 | 11:30 AM

Swami Chaitanyanand: मुली ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यसाठी जात होत्या, त्याच संस्थेमध्ये त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. इंस्टीट्यूटचा स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर येथील 17 विद्यार्थिनींवर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याते आरोप केले आहेत. तक्रारीत आरोप आहे की आरोपी स्वामी चैतन्यनंद सरस्वती पार्थ सारथी याने ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती अंतर्गत पीजीडीएम कोर्स करत असलेल्या महिला विद्यार्थिनींना अपशब्द वापरले आणि अश्लील व्हॉट्सअॅप/एसएमएस मेसेज पाठवले. एवढंच नाही तर, विद्यार्थिनींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा देखील प्रयत्न बाबाने केला. मिळालेल्या माहितीनुसार, श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तेचे प्रशासक श्री पी.ए. मुरली यांच्या वतीने 4 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीची सुरुवात…

4 ऑगस्ट 2025 रोजी, श्री शृंगेरी मठाचे प्रशासक पीए मुरली यांनी आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत असंही म्हटलं आहे की, संस्थेतील काही महिला प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरोपींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनींवर दबाव आणला, ज्यामुळे मुलींना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला.

विद्यार्थिनींचे जबाब…

तपासा दरम्यान, जवळपास 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले आहे. ज्यामध्ये 17 विद्यार्थिनींनी आरोपीवर अपशब्द, अश्लील मेसेज आणि शारीरिक संबंधांचे आरोप लावले आहेत. विद्यार्थिनींनी सांगितल्यानुसार, त्यांनी विरोध केल्यानंतर, काही महिला प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींवर बाबा जे सांगत आहे ते करण्यास दबाव टाकला…

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बराच काळ आपल्या प्रभावाचा वापर करून विद्यार्थिनींना धमकावण्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावरून असं दिसून येतं की हा मुद्दा एकाच घटनेपुरता मर्यादित नव्हता तर बराच काळ चालू होता. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

गरीब मुलींवर साधला निशाणा…

पोलिस सूत्रांनुसार, ज्या मुली EWS (आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग) कोट्यातून प्रवेश मिळाला होता. त्याच मुलींचा शिकार बाबा करत असे… या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि बाबाने त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतला. पीडितांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे की, बाबा त्यांना परदेश दौऱ्यांचे आश्वासन देऊन आमिष दाखवत असत, परंतु जर त्यांनी नकार दिला तर त्यांना परीक्षेत नापास करण्याची धमकी देत ​​असत.