काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग, आतापर्यंत तब्बल 26 बळी, काय आहे ISI चा प्लॅन?

काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी या मजुरावर गोळीबार केला, त्यात मजूर गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अमरेज काश्मिरात मजुरीच्या कामासाठी आला होता.

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग, आतापर्यंत तब्बल 26 बळी, काय आहे ISI चा  प्लॅन?
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग, आतापर्यंत तब्बल 26 बळी, काय आहे ISI चा प्लॅन?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:30 PM

श्रीनगरजम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) बांदिपोरा जिल्ह्यात सादुनारा गावात दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) शुक्रवारी पहाटे एका मजुराची गोळी मारुन हत्या केली आहे. हा मजूर बिहारच्या (Bihar) मधेपुरा जिल्ह्यातील रहिवासी होता. या मजुराची ओळख मोहम्मद अमरेज वय 19 वर्ष अशी पटली आहे. या घटनेनंतर पोलसांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी या मजुरावर गोळीबार केला, त्यात मजूर गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अमरेज काश्मिरात मजुरीच्या कामासाठी आला होता.

झोपलो होतो तेव्हा झाला गोळीबार, भवाने सांगितले

अमरेजच्या भावाने माध्यमांना सांगितले की- आम्ही दोघेही भाऊ झोपलो होतो, त्याचवेळी गोळीबार झाला. भावाने मला उठवले आणि सांगितले की गोळीबार सुरु आहे. मी त्याला सांगितले की हे होतच असते, तू झोप. त्यानंतर काही वेळाने भाऊ बाथरुमला जाण्यासाठी बाहेर गेला, त्यानंतर तो परतलाच नाही. मी त्याला शोधण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मला दिसला. त्यानंतर मी सैन्यदलाशी संपर्क केला त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र र्सत्यातच त्याने प्राण सोडले.

4 महिन्यांत काश्मीर खोऱ्यात 11 हत्या, सर्वाधिक हत्या बिहारींच्या

काश्मीरमध्ये गेल्या चार महिन्यात टार्गेट किलिंगमध्ये 11 जणंना प्राण गमवावा लागला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2022 मध्ये टार्गेट किलिंगची आत्तापर्यंत 26 प्रकरणे समोर आली आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे की, दहशतवादी काश्मिरात मजुरांना लक्ष्य करीत आहेत. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 2017 पासून 2022 पर्यंत 28 प्रवासी मजुरांची हत्या केली आहे. यातक सर्वाधिक 7 मजूर हे बिहारचे आहेत. त्यासह महाराष्ट्राचील दोन आणि झारखंडच्या एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. दहशतवादी सध्या हताश मानसिकतेत असल्याने त्यांनी रणनिती बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते निरपराध, सामान्य नागरिक, मजूर, अल्पसंख्याक, हत्यारबंद नसलेले पोलीस, राजकीय नेते, महिलांना टार्गेट करीत आहेत.

खोऱ्यात सातत्याने का होतायेत गैरकाश्मिरींच्या हत्या

पाकिस्तानला काश्मिरात अशातंता निर्माम कारयची आहे, त्याच उद्देशातून हे टार्गेट किलिंगचे प्रकार सुरु असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. कलम 370 हटवल्यानंतर काश्मिरात काश्मिरी पंडितांच्या पुवर्वसनात अडथळा निर्माण करायचा, हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येते आहे. कलम 370 हटवण्यात आल्यापासून काश्मिरात हा टार्गेट किलिंगचा प्रकार अधिक फोफावला आहे. यात प्रामुख्या काश्मिरी पंडित, प्रवासी मजूर तसेच सरकारमध्ये काम करणारे स्थानिक मुस्लीम या सारख्या सॉफ्ट टार्गेटना लक्ष्य करण्यात येते आहे. हे सगळेजण भारताच्या जवळचे आहेत, अशी दहशतवाद्यांची भूमिका आहे.

प्रपोगंडा पसरवून खोऱ्यात कार्यरत राहण्याचा कट

कलम 370 हटवल्यानंतर बाहेरच्या राज्यातून प्रवासी मजूर काश्मिरात नोकऱ्यांसाठी आणि जमिनी बळकावण्यासाठी येत आहेत, असा अपप्रचार काश्मिरी स्थानिकांमध्ये पसरवण्याचा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा प्लॅन आहे. या अपप्रचारातून काश्मिपात पाकिस्तान समर्थकांचा आणि दहशतवादी संघटनांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. तसेच टार्गेट किलिंगच्या माध्यमातून अजूनही खोऱ्यात दहशतवादी आणि पाकिस्तानचे अस्तित्व आहे, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही मानण्यात येते आहे. कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांच्याविरोधात भारतीय सैन्य दल आणि यंत्रणांनी केलेल्या कारवाईने काश्मिरात दहशतवाद्यांची ताकद कमी झाली आहे.

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.