AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे कपडे काढले आणि …. मुलांसोबत असं कधीच करु नका

अचानक क्लास मध्ये गेल्यावर समोर जे दिसल ते पाहून पालकांना मोठा धक्का बसला. सदर शिक्षिका या नऊ वर्षाच्या मुलाचे कपडे काढून त्याला बुक्क्यांचा मार देत होती. मुलगा रडत होता. तरी ही शिक्षिका मुलाला मारतच होती. मुलाच्या पालकांनी हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद केला

शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे कपडे काढले आणि .... मुलांसोबत असं कधीच करु नका
दिल्लीत दोन पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातच भिडले
| Updated on: Sep 02, 2022 | 9:41 PM
Share

जळगाव : मुलांना घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. आई-वडिल मोठ्या विश्वासाने मुलांना शिक्षकांकडे सोपवतात. मात्र, बऱ्याचदा शिक्षक शिक्षेच्या नावाखाली मुलांना मारहाण करतात. अशीच एक धकक्कादायक घटना जळगावात( Jalgaon) घडली आहे. एका शिक्षिकीने एका विद्यार्थ्याला कपडे काढून बेदम मारहणा केली आहे. पालकांनी या क्रूर शिक्षिकेला मुलाना मारहाण करताना रंगेहात पकडले आहे. पालकांनी या शिक्षिकेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जळगावातील एका खाजगी क्लास मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलगा हा नऊ वर्षाचा आहे. हा मुलगा या शिक्षिकेकडे खासगी शिकवणीसाठी येत होता. ही शिक्षिका त्याला नेहमी मारहाण करत असल्याची तक्रार त्याने आपल्या पालकांकडे केली होती.

मुलाच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे पाहण्यासाठी पालकांनी अचानक क्लास मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मुलाला आणि शिक्षकेला न सांगता पालक अचानक क्लासमध्ये गेले. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

अचानक क्लास मध्ये गेल्यावर समोर जे दिसल ते पाहून पालकांना मोठा धक्का बसला. सदर शिक्षिका या नऊ वर्षाच्या मुलाचे कपडे काढून त्याला बुक्क्यांचा मार देत होती. मुलगा रडत होता. तरी ही शिक्षिका मुलाला मारतच होती. मुलाच्या पालकांनी हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये कैद केला. यानंतर त्यांनी थेट शिक्षकेविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शिक्षिकेच्या मारहाणीमुळे मुलगा तणावात होता. तो सातत्याने पालकांना याबाबत सांगत होता. अखेरीस पालकांनीच या शिक्षिकेला मुलाला मारहाण करताना रंगेहात पकडले आहे. या प्रकारामुळे जळगाव शहरात एकच खळबल उडाली आहे. पोलिसात तक्रार दाखल झाली असली तरी पोलिसांनी अद्याप या शिक्षिकेला ताब्यात घेतलेले नाही.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....