दृश्यम स्टाईल हत्या, मृतदेह घरात पुरला, कॉलनीत सापडली बाईक, टॉवरजवळ लोकेशन

| Updated on: Oct 01, 2022 | 7:36 PM

बिंदू कुमार हे 26 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात केली होती. यानंतर पोलिसांनी बिंदू कुमार यांचा कसून तपास सुरु केला.

दृश्यम स्टाईल हत्या, मृतदेह घरात पुरला, कॉलनीत सापडली बाईक, टॉवरजवळ लोकेशन
घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची हत्या
Image Credit source: t v 9
Follow us on

केरळ : अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट (Drishyam Film) पाहून एका भाजप कार्यकर्त्याची हत्या (Bjp Activist Murder) केल्याची धक्कादायक घटना केरळमधील कोट्टायम (Kerala Kottayam) येथील चंगनसेरी येथे उघडकीस आली आहे. बिंदू कुमार असे हत्या करण्यात आलेल्या 43 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. दृश्यम सिनेमात दाखवल्याप्रमाणे हत्येनंतर मृतदेह जमिनीत गाडण्यात आला होता. हत्येची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले.

26 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते बिंदू कुमार

बिंदू कुमार हे 26 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात केली होती. यानंतर पोलिसांनी बिंदू कुमार यांचा कसून तपास सुरु केला.

मोबाईल लोकेशन उलगडले हत्येचे रहस्य

पोलिसांनी बिंदू कुमार यांचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते चंगनसेरी येथील एसी कॉलनीतील टॉवरजवळ दाखवले. त्यानंतर पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे एसी कॉलनीतील मुथुकुमार यांच्या घरी पोहचले. त्याचवेळी वकाथनम येथून बिंदू कुमार यांची दुचाकी जप्त करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

मुथुकमार हा बिंदू कुमार यांच्या परिचयाचा असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी मुथुकुमारच्या घराची संपूर्ण पाहणी केली असता घरात एका ठिकाणी नुकतेच लादीकरण केलेले दिसले.

सहा तासांच्या खोदकामानंतर मृतदेह सापडला

पोलिसांनी त्या ठिकाणी सहा तास खोदकाम केल्यानंतर बिंदू कुमार यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. फिंगरप्रिंट एक्स्पर्ट, श्वान पथकासह पोलिसांची विविध टीम घटनासथ्ळी अधिक तपास करत आहे. तसेच बिंदू कुमार यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करत आहेत.

दरम्यान, बिंदू कुमार यांची हत्या का आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आली? तसेच या हत्याकांडात किती आरोपींचा समावेश आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.