घरातल्याने दुसऱ्या मुलाबरोबर ठरविले लग्न, बॉयफ्रेंडने व्हायरल केला व्हिडीओ, मग मुलीने उचलले असे पाऊल की…

या दोघांनी घरच्यांना पटवून लग्न करायचे आणि एकत्र संसार करत मजेत राहायचे आणि जगायचे अशी स्वप्नं पाहिली होती. परंतू...

घरातल्याने दुसऱ्या मुलाबरोबर ठरविले लग्न, बॉयफ्रेंडने व्हायरल केला व्हिडीओ, मग मुलीने उचलले असे पाऊल की...
mobile-phone
Image Credit source: socialmedia
| Updated on: Apr 08, 2023 | 4:12 PM

लखनऊ : तिचे तिच्या दूरच्या नात्यातील मुलाशी सूत जुळले होते. परंतू घरच्यांनी तिच्या मनाचा विचार न करता भलत्याच मुलाशी तिचे लग्न ठरविले. त्यामुळे चिडलेल्या बॉयफ्रेंडने या मुली सोबतचे फोटो आणि व्हिडीओ आधी या मुलीला पाठविले आणि त्या मुलाशी लग्न न करण्यासाठी दबाव वाढवत राहिला, अखेर ही मुलगी काही बधत नाही हे पाहून त्याने तिच्या लग्न ठरलेल्या मुलालाच सर्व व्हिडीओ पाठवले. त्यामुळे घाबरलेल्या त्या मुलीने असे टोकाचे पाऊल उचलले की वाचून तुम्हालाही धक्का बसेल…

उन्नाव जिल्ह्यातील गंगाघाट कोतवालीच्या एका मोहल्ल्यात राहणाऱ्या एका मुलीचे तिच्या नात्यातील मुलाशी प्रेम होते. या दोघांनी घरच्यांना पटवून लग्न करायचे आणि एकत्र संसार करत मजेत राहायचे आणि जगायचे अशी स्वप्नं पाहिली होती. परंतू अचानक या मुलीचे लग्न तिच्या घरच्यांनी दुसऱ्याच एका मुलाशी ठरविले. त्यामुळे जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडला ही बातमी कळाली त्यावेळी त्याने बदला घ्यायचा ठरविले. त्याने त्या मुली सोबतचे एकत्र फोटो आणि व्हिडीओ आधी या मुलीला पाठवले आणि हे लग्न कसेही करुन मोडायचा दबाव तिच्यावर टाकला.

बॉयफ्रेंडची व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

अचानक आपल्या आयुष्यात आलेल्या या वादळाने ही मुलगी हादरली. बॉयफ्रेंडने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तिच्या समोर बाका प्रसंग उभा राहिला. घरच्यांचे ऐकायचे की आपल्या बॉयफ्रेंडबरोबर पळून जायचे असा तिच्यासमोर यक्षप्रश्न उभा राहीला. आपली गर्लफ्रेंड काही उत्तर देत नाही हे पाहून अखेर या तरूणाचा धीर सुटला आणि त्याने ती माझी नाही तर कुणाचीच तिला होऊ देणार नाही असा आततायी निर्णय घेत अखेर विचित्र प्रकार केला.

मुलाचा मोबाईल क्रमांक शोधला

त्या प्रेमवीराने लागलीच आपल्या गर्लफ्रेंडचे ज्या मुलाशी लग्न ठरले आहे त्या मुलाचा मोबाईल क्रमांक शोधून काढला आणि त्या मुलाला तिच्या सोबतचे सर्व व्हिडीओ पाठविले. त्यामुळे त्या मुलाने लग्नच मोडून टाकले. त्यामुळे आता या मुलीला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली. आपल्या बॉयफ्रेंडच्या या अशा पावलाने मानसिकरित्या कोलमडलेल्या या तरूणीने शुक्रवारी दुपारी गंगा पुल गाठला आणि त्यात उडी मारली. परंतू गंगा पुलाखाली नदीतून पैसे शोधणाऱ्या पानबुड्यांनी तिला तातडीने उडी मारत तिला सुखरूप पाण्याबाहेर काढले. अखेर पोलिसांनी या तरूणीला जिल्हा रूग्णालयात तिला दाखल केले असून तिच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.