रंगपंचमीच्या दिवशी पत्नीने चिकन बनवले नाही, संतापलेल्या पतीने पत्नीचे…

चिकन बनवण्यास नकार दिला म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

रंगपंचमीच्या दिवशी पत्नीने चिकन बनवले नाही, संतापलेल्या पतीने पत्नीचे...
पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण
Image Credit source: Google
| Updated on: Mar 09, 2023 | 4:17 PM

चंद्रपूर : चिकन बनवून दिले नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीत महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. धुलिवंदनच्या दिवशी मंगळवारी ही घटना घडली. याबाबत पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

काय आहे प्रकरण?

धुलिवंदनच्या दिवशी पती बाजारातून चिकन घेऊन घरी आला आणि पत्नीला चिकन बनवून देण्यास सांगितले. यावर पत्नीने जेवण आधीच तयार आहे, संध्याकाळी बनवून देते असे सांगितले. यामुळे पतीला संताप अनावर झाला अन् तो अंगणात पडलेला दांडा घेऊन आला आणि पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीच्या डोक्यावर अनेक वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली.

मारहाणीत महिलेला गंभीर दुखापत

मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, एक हात फ्रॅक्चर झाला आहे. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात नेले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

चारित्र्याच्या संशयातून नागपूरमध्ये पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना नागपूरात घडली आहे. लतिका भारद्वाज असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे, तर अमर भारद्वाज असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अमर भाजीपाला विक्री करायचा, तर मृत लतिका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. दोघांना दोन मुली आहेत.