नाशिकच्या मोठ्या उद्योजकाला गाडीत बसवलं, नोकराला चहा घ्यायला पाठवले… आणि नंतर मृतदेह समोर आला…

| Updated on: Sep 12, 2022 | 11:56 AM

शिरीष गुलाबराव सोनवने यांचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी साडे चारच्या सुमारास कारखान्यात असतांना एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्तीपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख यास मालक सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे असे सांगून गाडी जवळ बोलविण्यास सांगितले.

नाशिकच्या मोठ्या उद्योजकाला गाडीत बसवलं, नोकराला चहा घ्यायला पाठवले... आणि नंतर मृतदेह समोर आला...
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

नाशिक : नाशिक शहरातील फर्निचर उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे (businessman) यांचा अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह मालेगाव येथील सायतरपाडे येथे सापडला आहे. प्राथमिक दृष्ट्या आर्थिक व्यवहारातून त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. सोनवणे यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने शरीरात रक्तस्राव झाला व नाक तोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकणी मालेगाव ( malegaon) तालुका पोलीस ठाण्यात खून, अपहरण, पुरावे नष्ट करणे, कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

शिरीष गुलाबराव सोनवने यांचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी साडे चारच्या सुमारास कारखान्यात असतांना एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्तीपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख यास मालक सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे असे सांगून गाडी जवळ बोलविण्यास सांगितले.

पण, फिरोज याने त्यांना नकार देत आपणच कारखान्यात या आणि काय ते बोला असे सांगितले. परंतु, गाडीत बसलेल्या व्यक्तीने आपण अपंग असून चालता येत नाही असे सांगत सोनवणे यांना गाडीत बोलवा, असे सांगितल्यावर सोनवणे हे सदर गाडीत बसले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, फिरोज यास चहा आणण्यासाठी सांगण्यात आले, चहा देऊन फिरोज हा कारखान्यात गेला, पण बराच वेळ झाला तरी मालक आत आले नाही तसेच परंतु त्याने गाडी सिन्नरफाटाच्या दिशेने जातांना कामगारांनी पाहिली, यानंतर सोनवणे यांचा पत्नी यांचा कारखान्यातील कामगारांस फोन आला आणि मालक सोनवणे यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून विचारणा केली, यावेळी कामगारांनी बाहेर पाहिले असता मालक सोनवणे दिसून आले नाही.

यानंतर सर्वत्र खळबळ उडाली व नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. यानंतर शनिवारी त्यांचा मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे येथील कालव्यात सापडला यानंतर मालेगाव पोलिसांनी त्यांचे फोटो हे पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर टाकले.

यानंतर नाशिकरोड पोलिसांनी मृतदेहाची ओळख सोनवणे यांचा नातेवाईकांकडून पटविली असता हा मृतदेह त्यांचा असल्याचे समोर आले होते. शवविच्छेदनानंतर त्यांच्या डोक्यास जबर मार लागला आणि शरीरात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात खून तसेच अपहरण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनवणे यांचा खून कोणी केला का केला की आर्थिक वादातून हा खून झाला याचा तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.