नाशिक : नाशिकमध्ये (Nashik drowned News) 25 वर्षांचा शुभम चव्हाण (Shubham Chavhan) हा तरुण मुलगा मित्रांसोबत धबधब्यावर (Waterfall) गेला होता. पण प्राण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि हा तरुण मुलगा वाहून गेला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे शुभमसोबत गेलेले त्याचे इतर 9 मित्रही प्रचंड धास्तावले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर शुभमचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही सुरु करण्यात आलं. पण अजूनही शुभमचा शोध लागलेला नाही. त्यामुळे चव्हाण कुटुंबीयांसह शुभमसोबत गेलेले त्याचे मित्रही कासावीस झालेत. अजनही शुभमचा शोध सुरु आहे.