AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणामुळे पोलीस कर्मचाऱ्याने संपवले जीवन, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

मयत भाऊसाहेब यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषी पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

'या' कारणामुळे पोलीस कर्मचाऱ्याने संपवले जीवन, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
अहमदनगरमध्ये पोलिसाची आत्महत्याImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Oct 01, 2022 | 6:31 PM
Share

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : अहमदनगर पोलीस (Ahmednagar Police) दलातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुरी येथे धरणावर सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:ला बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या (Suicide by Firing) केल्याची घटना आहे. अतिरिक्त पोलीस निरिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट (Suicide Note) देखील घटनास्थळी सापडली आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब आघाव असे 49 वर्षीय मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

राहुरी धरण परिसरात सेवा बजावत होते

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी धरण परिसरात सुरक्षा गार्ड म्हणून भाऊसाहेब आघाव हे सेवा बजावत होते. तेथे एका खोलीत स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आलं आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील सूचना दिल्या. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय.

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

जेथे घटना घडली तेथे एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात अकोले तालुक्यातील राजूर येथे बंदोबस्ता‌साठी असताना तेथील पोलिसांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याने हतबल झाल्याचं त्यात म्हटलंय.

अतिरिक्त पोलीस निरिक्षक आणि तीन पोलिसांनी संगनमताने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अवैध धंदे बंद केल्याने अतिरिक्त पोलीस निरिक्षक यांनी खोटा गुन्हा दाखल केला. तसेच गुन्हा मागे घेण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय.

नातेवाईकांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

आत्महत्येस पोलीस निरीक्षकासह आणखी तीनजण कारणीभूत असल्याच देखील यात नमूद आहे. दरम्यान, मयत भाऊसाहेब यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषी पोलिसांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचं संभाषण व्हायरल झाल असून, त्या ऑडिओ क्लिपमध्ये अधिकारी भाऊसाहेब आघाव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी कसा बनाव करत आहेत याचा उल्लेख आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...