अवघ्या 14 वर्षांची विद्यार्थीनी एका प्रौढाच्या संपर्कात आली, शिक्षकाने केला मोबाईल जप्त, त्यानंतर 20 जणांचा जीव गेला

या चौदा वर्षांच्या मुलीचे एका प्रोढ व्यक्तीशी संपर्क असल्याचा उलगडा शाळा प्रशासनाला लागला होता. त्यातून तिचा मोबाईल फोन शाळा प्रशासनाने जप्त केला होता.

अवघ्या 14 वर्षांची विद्यार्थीनी एका प्रौढाच्या संपर्कात आली, शिक्षकाने केला मोबाईल जप्त, त्यानंतर 20 जणांचा जीव गेला
guyanaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 6:06 PM

गुयाना : हल्लीची तरूण पिढी मोबाईलच्या इतक्या आहारी गेली आहे की मोबाईलच्या वेडापायी मुलांनी मैदानी खेळ सोडून दिले असून तरूण मुले दिवसरात्र मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले दिसतात. दक्षिण अमेरिकेतील राज्य गयाना देशात एक भयंकर घटना घडली आहे. एका चौदा वर्षांच्या मुलीचा मोबाईल शिक्षकांनी जप्त केला म्हणून या मुलीने तिच्या शाळेलाच आग लावल्याचा आरोप होत आहे. या  भयंकर आगीत  20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

दक्षिण अमेरिकेतील देश गयाना / गुयाना यामध्ये एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेला आग लावल्याचा आरोप आहे. तिच्या या उपदव्यापाने 20 जणांचा नाहक जीव गेला आहे. टीचरने तिचा मोबाईल फोन जप्त केल्याने तिने शाळेला आग लावण्याची धमकी दिली होती. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानूसार सोमवारी रात्री महदीया सेकेंडरी स्कूलच्या ( Mahdia Secondary School ) गर्ल्स हॉस्टेलला आग लागली होती. या आगीत स्कूलचा बराचसा भाग जळून खाक झाला. अनेक विद्यार्थीनी आणि स्टाफ अडकला. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या भिंती तोडून मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला. तरीही 20 जणांचा मृत्यू झाला.

ही घटना राजधानी जॉर्ज टाऊनपासून 200 मैल अंतरावर असलेल्या सेंट्रल गुयाना मायनिंक टाऊनमध्ये घडली. आग लावल्याचा आरोप असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थींला स्वत:लाही जखमा झाल्या आहेत. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या मुलीचा मोबाईल फोन शिक्षकांनी जप्त केल्याने तिने संताप व्यक्त केला होता. त्या रागात तिने शाळेला आग लावण्यासारखे पाऊल उचलले आणि स्वत: देखील आगीत जखमी झाली.

एका प्रोढ व्यक्तीशी संपर्क

या चौदा वर्षांच्या मुलीचे एका प्रोढ व्यक्तीशी संपर्क असल्याचा उलगडा शाळा प्रशासनाला लागला होता. त्यातून तिचा मोबाईल फोन शाळा प्रशासनाने जप्त केला. त्यामुळे तिने गर्ल्स हॉस्टेलला आग लावण्याची धमकी दिली होती. आगीत ती स्वत: जखमी झाली आहे. तिला रूग्णालयात ठेवले आहे, अन्य नऊ जखमींवर देखील उपचार होत आहेत. या आगीत मृत्यू पावलेल्या मध्ये आजूबाजूच्या गावातून आलेल्या 12 ते 18 वर्षांच्या मुली तसेच शाळेत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचासह तिच्या पाच वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. अमेरिकेसारख्या देशाने मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए तज्ज्ञ पाठविण्याची घोषणा केली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.