Delhi Wall Collapse : दिल्लीत मोठी दुर्घटना, निर्माणाधीन गोदामाची भिंत कोसळली, 6 मजुरांचा मृत्यू

| Updated on: Jul 15, 2022 | 4:08 PM

अपघात झाला त्यावेळी गोदामात 20 ते 25 मजूर काम करत होते. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे. 7 जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Delhi Wall Collapse : दिल्लीत मोठी दुर्घटना, निर्माणाधीन गोदामाची भिंत कोसळली, 6 मजुरांचा मृत्यू
दिल्लीत मोठी दुर्घटना, निर्माणाधीन गोदामाची भिंत कोसळली
Image Credit source: ANI
Follow us on

दिल्ली : निर्माणाधीन गोदामाची भिंत कोसळून (Wall Collapsed) 6 मजूर ठार झाल्याची दुर्घटना शुक्रवारी दिल्लीतील अलीपूर येथे घडली आहे. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू (Death) झाला तर 14 जखमी (Injured) झाले. जखमींना राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी गोदामात 20 ते 25 मजूर काम करत होते. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. तक्रार करुनही डीएम आणि एसडीएम कार्यालय बेकायदा गोदामांचे बांधकाम थांबवत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तेथे पोहोचून बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफ गाझियाबाद, द्वारका दिल्लीच्या प्रादेशिक प्रतिसाद केंद्राचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. ढिगाऱ्याखालून 14 मजुरांना जिवंत बाहेर काढण्यात आले. दरम्यान, घटना कशी घडली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले

दुर्घनेत झालेल्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच ते मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अलीपूरमध्ये एक दुःखद दुर्घटना घडली. जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. मी स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. (The wall of a warehouse under construction in Delhi collapsed, killing five workers)