Kalyan Crime : कल्याणमध्ये मिठाई दुकानात चोरी, सीसीटीव्हीच्या मदतीने तिघांना ठोकल्या बेड्या

पोलिसांच्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगर असून त्यांच्यावर अंबरनाथ, बदलापूर, विक्रोळी, मध्यवर्ती, महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 7 गुन्हे उघडकीस आले आहेत.

Kalyan Crime : कल्याणमध्ये मिठाई दुकानात चोरी, सीसीटीव्हीच्या मदतीने तिघांना ठोकल्या बेड्या
कल्याणमध्ये मिठाई दुकानात चोरी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 4:16 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील चिकणघर परिसरात मोरया स्वीट अँड ड्रायफ्रुटसचे दुकान आहे. या दुकानाचे शटर लोखंडी रॉडने तोडण्यात आले आणि 32 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरी (Theft) झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गणेश मापारी यांच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही (CCTV)च्या साह्याने तपास करत तीन आरोपींना बेड्या ठोकत (Arrest) 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. मोहम्मद करीम ऊर्फ लाडो अख्तरअली बागवान (20), साकीर जाकीर खान (20) आणि शिवम महेंद्र बतमा ऊर्फ मच्छी (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सात गुन्ह्यांची केली उकल

कल्याण पश्चिम मधील मोरया स्वीट दुकानात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली होती. या चोरीचा तपास करत महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोहम्मद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान या दोन आरोपींना अटक करत 7 हजार रुपये हस्तगत करत पोलिसांनी अधिक चौकशी केली. चौकशीत त्याने आपला साथीदार साकीर खानसह मिळून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिर्ला कॉलेज परिसरात 7 घरफोडी करत 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच अर्धा किलो वजनाची चांदीची भांडी असा आठ लाखाचा माल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार महात्मा फुले पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकत तपास सुरू केला आहे.

आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगर असून त्यांच्यावर अंबरनाथ, बदलापूर, विक्रोळी, मध्यवर्ती, महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे तिन्ही आरोपी 20 वर्षांचे असून मोहम्मद हा उल्हासनगर, साकीर हा कल्याण तर शिवम हा अंबरनाथ येथे राहतो. या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कुटी, कटावणी व घरफोडीतील आठ लाखाचा माल हस्तगत केला आहे. (Theft in a sweet shop in Kalyan, three arrested with the help of CCTV)