विचित्र चोराची, विचित्र चोरी, घरात घुसतो अन्…; महिलांमध्ये दहशत

मध्यप्रदेशात एका चोराने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याच्या विचित्र चोरीमुळे महिला धस्तावल्या आहेत. तो घरात घुसून अश्लील चाळे करतो आणि महिलांचे अंतर्वस्त्रच पळवून नेतो. या चोरीमुळे सर्वच त्रस्त झाले आहेत.

विचित्र चोराची, विचित्र चोरी, घरात घुसतो अन्...; महिलांमध्ये दहशत
Thief
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2023 | 1:41 PM

इंदौर : मध्य प्रदेसातील इंदौरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका चोरामुळे इंदौरमधील स्त्रीया आणि तरुणी प्रचंड वैतागल्या आहेत. हा चोर घरामध्ये घुसतो. महिलांसमोर अश्लील चाळे करतो आणि त्यांच्या अंडरगारमेंट्स चोरी करून पळून जातो. या प्रकरणी अनेक महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या चोराला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे धुंडाळून पाहिले, त्यात या चोराचे विचित्र कारनामे समोर आले आहेत. या कामांध चोराचा फोटोही घेण्यात आला असून आता त्याचा शोध घेतला जात आहे.

विजय नगर पोलीस ठाण्यातील परिसरातील या घटना आहेत. गेल्या काही दिवसांपासून या महिला या चोरामुळे त्रस्त झाल्या आहेत. तो घरात घुसतो. महिला आणि तरुणींसोबत अश्लील चाळे करतो. आणि त्यांच्या अंडरगारमेंट्स घेऊन पळून जातो. या घटना वारंवार घडत असल्याने या महिला आणि तरुणींनी आपल्या कुटुंबीयांसह विजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. हा चोर विजय नगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याआधारे आता पोलीस त्याचा शोध घेत आहे.

महिलांना घरी सोडून जाता येत नाही

या परिसरात राहणारे शिबू यादव यांनी या चोराच्या चाळ्यांची माहिती दिली. हा तरुण येतो. महिलांशी अश्लील चााळे करतो. बाकी काहीच चोरी करत नाही. त्याच्या या विचित्र चोरीच्या प्रकारामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांना घरी एकटं सोडूनही जाण्याची भीती वाटते. पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करावी एवढीच अपेक्षा आहे, असं शिबू यादव यांनी सांगितलं.

घाबरण्याचं कारण नाही

आम्हाला या प्रकाराची तक्रार मिळाली आहे. कुणीही घाबरण्याचं कारण नाही. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याची ओळख पटवली जात आहे. त्याला पकडून कठोर शिक्षा केली जाईल, असं पोलीस अधिकारी दिनेश वर्मा यांनी सांगितलं.