नवरदेवाच्या गळ्यातील पाचशेच्या नोटांची माळ चोरट्यांनी पळविली, मग पोलिसांनी 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले

दिल्लीच्या जगतपुरी परिसरात एका नवरदेवाच्या गळ्यातील नोटांची माळ दोघा बाईकस्वारांनी पळविल्याची घटना घडली होती, पोलीसांनी शिताफीने दोघांना अटक केली.

नवरदेवाच्या गळ्यातील पाचशेच्या नोटांची माळ चोरट्यांनी पळविली, मग पोलिसांनी 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले
note
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 21, 2023 | 10:47 AM

नवी दिल्ली : एका नवरदेवाच्या गळ्यात वरातीतील लोकांनी हौसेने पाचशेच्या नोटांची एक लाख रूपयांची पैशांची माळ हौसेन घातली होती. मात्र अचानक बाईकवरून आलेल्या दोघा जणांनी ही माळ खेचून पलायन केल्याची घटना दिल्लीच्या जगतपूरी परीसरात घडली आहे. या प्रकरणात दिल्लीच्या जगतपुरी पोलीसांनी आजुबाजूच्या पाच ते सहा किमी परिसरातील सीसीटीव्ही तपासून 20  ते 25 वर्षांच्या दोघा आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

दिल्लीच्या जगतपुरी परिसरात एका नवरदेवाच्या गळ्यातील नोटांची माळ दोघा बाईकस्वारांनी चोरल्याची तक्रार 31 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती, पोलीसांनी तक्रार प्राप्त होताच या आजूबाजुच्या पाच ते सहा किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. तेव्हा स्कूटर वरून जाणारे हे आरोपी गीता कॉलनीकडे जाताना पोलिसांना दिसले, त्यामुळे पोलिसांनी तेथे आपले गुप्तबातमीदार कामाला लावले.

आधी एका आरोपीला अटक….

सीसीटीव्ही फुटेजचा तपास करता गीता कॉलनीच्या घर क्र.2/79 येथे पोलीसांना हवी असलेली स्कूटर पोलीसांनी दिसले. स्कूटरवर सीसीटीव्हीत दिसलेल्या 26 वर्षीय जसमीत याला अटक झाली. त्यानंतर पोलीसांनी त्याची लाल आणि काळी स्कूटी (DL3SFE-0813) जप्त केली.

पोलीस चौकशी आरोपी जसमीत सिंह एका फूड डिलीव्हरी बॉयचे काम करीत असल्याचे उघडकीस आले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या सहकाऱ्याची माहिती दिली. त्यानंतर 22  वर्षीय राजीव महतो याला अटक करण्यात आली.

पाचशे रूपयांच्या 20 नोटा जप्त …

आरोपी राजीव पाचवीपर्यंतच शिकलेला आहे. तो देखील डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. राजीवला ड्रग्जचे व्यसन आहे. तसेच सोनसाखळी चोरीचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. जसमीत कडून पाचशेच्या 11 आणि राजीवकडून 9 नोटा सापडल्या अशा एकूण दहा हजाराच्या नोटा जप्त केल्या आहेत.

असे होते संपूर्ण प्रकरण

जगतपूरीच्या द्वारकापूरीत राहणारे अंकित गुप्ता यांचे बंधू अनू गुप्ता याचे लग्न दिल्लीच्या पटपडगंज रोड येथील स्टार पॅलेस येथे होते. लग्नाची वरात स्टार पॅलेसला जात असताना बाईकवरुन आलेल्या दोघा  जणांनी त्यांच्या गळ्यातील पाचशेच्या नोटांची माळ पळविली होती.