Ahmednagar Crime : येवल्यातील अफगाणी सुफीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, आरोपींककडून शस्त्रास्त्र जप्त

| Updated on: Aug 04, 2022 | 9:56 PM

येवला तालुक्यातील नियोजित चिचोंडी एमआयडीसी परिसरात 5 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अफगाणी सुफीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

Ahmednagar Crime : येवल्यातील अफगाणी सुफीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, आरोपींककडून शस्त्रास्त्र जप्त
सांगलीत बडोदा बँकेची 16 कोटीं 97 लाखाची फसवणूक
Image Credit source: tv9
Follow us on

अहमदनगर : गेल्या महिन्यात येवला तालुक्यात झालेल्या अफगाणी सुफी (Afgani Sufi)च्या हत्ये (Murder)प्रकरणी तीन आरोपींना बुधवारी रात्री राहुरी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपींकडून दोन गावठी कट्टे आणि पाच काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. संतोष हरीभाऊ ब्राम्हणे (27 समतानगर ता. कोपरगाव जि. अ.नगर), गोपाळ निंबा बोरगुले (26 रा. चवडी मालेगाव) आणि विशाल सदानंद पिंगळे (23 रा. बैलबाजार रोड, कोपरगाव) अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत. राहुरी तालुक्यातील एका हॉटेलमधून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या एक महिन्यापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते.

एक महिन्यापूर्वी झाली होती सुफीची हत्या

येवला तालुक्यातील नियोजित चिचोंडी एमआयडीसी परिसरात 5 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अफगाणी सुफीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे मयत सुफीचे नाव आहे. घटनास्थळावरून चार अज्ञात संशयितांनी घटनेनंतर पोबारा केला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी काही तासांत छडा लावला असून हत्येचा उलगडा केला होता. मात्र आरोपी फरार होते. ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याची माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली होती.

सूफी स्वतःला मुस्लिम धर्मगुरुंचा अवतार मानायचा

नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सदर अफगाण सुफीची हत्या त्याच्या ड्रायव्हरनेच केल्याची धक्कादायक माहिती दिली. सुफीच्या डोक्यात गोळी झाडून ही हत्या करण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांना एका भूखंडावर नारळ फोडून, अगरबत्ती लावून, कुंकू डबी मिळून आली होती. मयत सुफीचा मित्र गफार आणि आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला होता. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती हा अफगाणिस्तानचा होता. नाशिक जिल्हयातील वावी या गावी तो विस्थपित म्हणून राहात होता. या वर्षाच्या शेवटी त्याची मुदत संपणार होती. त्याने वावी परिसरात 5 एकर जमीन दुसऱ्याच्या (त्याचा मॅनेजर) नावावर घेतली होती. त्याची आणखी काही प्रॉपर्टीही आहे. स्वतःला तो मुस्लिम धर्मगुरूंचा अवतार सांगत असे. त्याचे देश-विदेशात अनुयायी असल्याचे सांगण्यात येते. (Three arrested in connection with killing of Afghani Sufi in Yevala, weapons seized)

हे सुद्धा वाचा