
मुंबई – वाघोबा घाटात (waghoba ghat palghar) आढळलेल्या मृतदेहाचा अखेर छडा लावण्यात पालखर पोलिसांना (palghar police) यश आलं आहे. पालघरच्या वाघोबा घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची खबर पालघर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी माहिती मिळताच जवळपासच्या सगळ्या बेपत्ता असलेल्या व्यक्तींची यादी (List of missing persons) त्यांच्या हातात मिळाली. काही गोष्टी एका व्यक्तीशी साम्य असल्याने त्यांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. तपास करत असताना आरोपी घुमजाव करत असल्याचे पोलिसांचे लक्षात आले. प्रेयसी वारंवार अनेक गोष्टींची मागणी करत असल्याने तिला काटा काढल्याचे पालघर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. आरोपी प्रियकराचं नाव झिको अंसलीम मिस्कीत असं आहे. प्रियकरासोबत असलेल्या त्याच्या मित्राला सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मागण्यांना कंटाळल्याने उचललं पाऊल
मुलीचे नाव पिंकी असून झिको अंसलीम मिस्कीत यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पिकी ही तरूणी मुळची बांद्रा परिसरातील रहिवासी आहे. तिच्याकडून होणा-या वारंवार मागण्यांना तिचा प्रियकर पुर्णपणे कंटाळला होता. तो तिला अनेक दिवसांपासून सहन करत होता. काही मागण्या खर्चीक होत्या. त्याला अनेक गोष्टी सहन सुध्दा होत नव्हत्या. त्यामुळे त्याने तिला संपवायचा निर्णय घेतला. अखेरीस त्याने तिला संपवायचं ठरवलं, त्यासाठी एक प्लॅन तयार केला आणि तिला संपवलं.
पालघर पोलिसांनी असा लावला छडा
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिच्या बॉयफ्रेंडला चौकशीसाठी बोलावलं. त्यावेळी घाबरलेल्या बॉयफ्रेंडने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांना त्याला हेरला आणि पोलिसी खाक्या दाखवताचं त्याने खुनाची कबुली दिली. पालघरच्या वाघोबा घाटात तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेला होता. परंतु ते शक्य झालं नाही. सदर कृत्य त्याने एकट्याने केलेलं नसून त्याच्यासोबत अजून एकजण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. झिको अंसलीम मिस्कीत याने तिला वारंवार समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता. परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे त्याने आणि त्याच्या मित्राने तिचा काटा काढला. मृतदेहाची ओळख पटू नये आणि आपल्या अंगावर कोणतीही गोष्ट येऊ नये म्हणून मृतदेह पालघरच्या वाघोबा घाटात त्यांनी फेकला होता. पालघर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.