पतीच्या समर्थनार्थ पत्नी उतरली मैदानात, पोलिसांना आव्हान देत चढली टॉवरवर, शोले स्टाईल आंदोलन कशासाठी?

बुलढण्यात आपल्या पतीसाठी आंदोलन करत असलेल्या महिलेने चाळीस फुट टॉवरवर चढून काही मागण्या केल्या आहे. त्यामुळे या आंदोलनाची जोरदार चर्चा होत आहे.

पतीच्या समर्थनार्थ पत्नी उतरली मैदानात, पोलिसांना आव्हान देत चढली टॉवरवर, शोले स्टाईल आंदोलन कशासाठी?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 10, 2023 | 1:03 PM

बुलढाणा : सध्या बुलढण्यातील सारंगपुर येथे एका महिलेकडून सुरू असलेले आंदोलन ( Buldhana Protest ) चर्चेचा विषय ठरत आहे. पतीवर दाखल झालेला गुन्हा खोटा पोलिसांनी ( Crime News ) मागे घ्या आणि पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी करत महिला थेट टॉवरवर चढली आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातील चाळीस फुट टॉवरवर महिलेने आंदोलन सुरू केल्याने पोलिसांसह तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली आहे. पत्नीने सुरू केलेले शोले स्टाइल आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत असून जोपर्यन्त पतीवरील गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका घेलती आहे. विशेष म्हणजे पतीवर एका महिलेने छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाण्यातील मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारंगपूर येथील गावातील एका महिलेने गजानन बोरकर यांच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा खोटा असून माझी तक्रार घेण्यात यावी अशी महिलेची मागणी आहे.

यासोबत महिलेची तक्रार दाखल करून न घेणाऱ्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय पोलीस कॉन्स्टेबल नबी यांना निलंबित यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सारंगपूर येथील रुख्मिणी गजानन बोरकर या महिलेने मेहकर तहसील कार्यालयाच्या आवारातील 40 फूट उंच टॉवरवर चढून सकाळपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. या शोले स्टाईल आंदोलनाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

यावेळी आंदोलन करणाऱ्या महिलेने पोलिसांनाच आव्हान देत जो पर्यंत माझ्या मागणीची दखल घेतली जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचा पवित्रा या महिलेने घेतल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.