Indapur : शाळकरी मुलीला डंपरने उडविले, अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू; जमावाने पेटविला डंपर

मुलीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती गावात समजताचं घटनास्थळी लोकांची गर्दी वाढली. त्यावेळी अपघात झाल्यानंतर चालकाने पळ काढल्याचं कारण समजलं आहे. संतप्त झालेल्या जमावाने चालकाचा शोध घेतला.

Indapur : शाळकरी मुलीला डंपरने उडविले, अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू; जमावाने पेटविला डंपर
शाळकरी मुलीला डंपरने उडविले, अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू; जमावाने पेटविला डंपर
Image Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 1:57 PM

इंदापूर – डंपरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यामध्ये शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना इंदापूर (Indapur) येथील काटी गावात घडली आहे. डंपरने दिलेली धडक इतकी जोराची होती, की मुलीचा जागीचं मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये तिचे चुलते आणि मुलीचा भाऊ देखील गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी हा अपघात (Accident) झाला त्यावेळी घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते. दोन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपर पेटवून दिला आहे.

चुलता मुलीचा भाऊ गंभीर जखमी

इंदापूर तालुक्यातील काटी या गावी अपघात झाला आहे. तिथल्या काटेश्वर विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेल्या शाळकरी मुलीला खडी ने भरलेल्या टीपरने चिरडले आहे. ही मुलगी तिच्या चुलत्यासोबत शाळेत जात होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे. डंपरने इतक्या जोरात धडक दिली की, मुलीचा चुलता देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचबरोबर मुलीचा भाऊ देखील गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. दोघांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरु असून संपुर्ण गावावरती शोककळा पसरली आहे.

…डंपर पेटवून देण्यात आला

मुलीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती गावात समजताचं घटनास्थळी लोकांची गर्दी वाढली. त्यावेळी अपघात झाल्यानंतर चालकाने पळ काढल्याचं कारण समजलं आहे. संतप्त झालेल्या जमावाने चालकाचा शोध घेतला. परंतु तिथं चालक कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर डंपर पेटवून देण्यात आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करीत आहेत. तसेच संबंधित डंपर चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिथल्या ग्रामस्थांनी केली आहे. सदर घडलेली घटना भयंकर असल्याने पोलिस तिथं तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुर्ण डंपरला आगीने वेडा घातला आहे.