AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बऱ्याच दिवसांनी दोन मित्र भेटले, गप्पा रंगल्या, जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला तिथेच घात झाला, पुण्यातील थरारक घटना

गुन्हा घडला त्या दिवशी दोघे मस्त उभे राहून गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात त्यांच्यामध्ये जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. तिथेच घात झाला.

बऱ्याच दिवसांनी दोन मित्र भेटले, गप्पा रंगल्या, जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला तिथेच घात झाला, पुण्यातील थरारक घटना
Pune Crime
| Updated on: Feb 04, 2026 | 2:05 PM
Share

दोन जुने मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले. त्यांच्यात मस्त गप्पा रंगल्या होत्या. या गप्पा रंगात आलेल्या असताना जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्यांच्यात एका फोन कॉलवरुन इतकं जोरदार, टोकाचं भांडणं झालं की, एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयता घेऊन सपासप वार केले. धनकवडी भारती विद्यापीठ परिसरात त्रिमूर्ती चौकाजवळ 2 फेब्रुवारीला रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. चेतन चव्हाण याने बाजूच्या उसाच्या रसवंतीवरील लोखंडी हत्यार घेऊन आदित्य कांबळे याच्या हातावर, डोक्यावर आणि कानाजवळ कोयत्याने वार केले. यात आदित्य गंभीर जखमी झाला असून डोक्यात आणि हाताला 30 टाके पडले आहेत.

गंभीर जखमी असणाऱ्या आदित्य कांबळे या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.भारती विद्यापीठ परिसरात एक ऊसाची गाडी लागते. तिथे सोमवारी रात्री 8 च्या सुमारास ही जीवघेणी घटना घडली. चेतन आणि आदित्य परस्परांचे खूप चांगले मित्र होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडी परिसरात एकच खळबळ

गुन्हा घडला त्या दिवशी दोघे मस्त उभे राहून गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात त्यांच्यामध्ये जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. तिला फोन करण्याच्या मुद्यावरुन दोघांमध्ये आपसात इतकी जुंपली की, चेतन चव्हाण याने बाजूच्या उसाच्या रसवंतीवरील लोखंडी हत्यार घेऊन आदित्य कांबळे यांच्यावर वार केले. आदित्यला भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा सगळा भयानक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या खूनी हल्ल्यामुळे धनकवडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा