Jammu-Kashmir : काश्मिरात पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश; टार्गेट किलिंगसाठी शस्त्रे घेऊन आलेले दोघे अटक

| Updated on: Aug 24, 2022 | 3:21 AM

उत्तर काश्मीरमधील सफरचंदांची टोपली म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोपोरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करून टार्गेट किलिंगचा मोठा कट उधळून लावला.

Jammu-Kashmir : काश्मिरात पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश; टार्गेट किलिंगसाठी शस्त्रे घेऊन आलेले दोघे अटक
काश्मिरात पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका दहशतवादी कट-कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्करच्या संकरित (हायब्रीड) दहशतवाद्या (Terrorist)ला आणि एका ओव्हर ग्राउंड वर्करला (OGW) अटक (Arrest) केली आहे. सोपोर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी ही अटकेची कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे तसेच अनेक स्फोटके जप्त (Explosives Seized) करण्यात आली आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे. हे दहशतवादी टार्गेट किलिंगसाठी शस्त्रे घेऊन काश्मीर खोऱ्यात आले होते, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

सुरक्षा दलांनी टार्गेट किलिंगचा मोठा कट उधळून लावला

उत्तर काश्मीरमधील सफरचंदांची टोपली म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोपोरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करून टार्गेट किलिंगचा मोठा कट उधळून लावला. अटक करण्यात आलेला दहशतवादी आणि त्याच्या साथीदाराची मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यांच्याकडून दोन ग्रेनेड, एक पिस्तूल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याआधी सुरक्षा दलांनी बारामुल्लाच्या गालिबल भागात दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून ब्लँकेट आणि रेशन जप्त केले आहे. जमीन खोदून ही जागा तयार करण्यात आली होती व त्यावर लाकूड आणि गवत टाकले होते.

आरोपींच्या साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये रात्री 7 वाजताच्या सुमारास दोन दहशतवादी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांसह पथके तयार केली. नौपोरा, सिक्सवे जंक्शन, बेहरामपुरा पूल, सोनवणी पूल आणि बेहरामपोरा सीलू पूल यासह विविधं ठिकाणी ब्लॉक लावण्यात आले होते. बेहरामपोरा सीलू पुलावर सायंकाळी 7.30 च्या सुमारास जवानांना एक वाहन सीलूच्या दिशेने येताना दिसले. त्यात दोन तरुण होते. नाकाबंदी पाहून त्या तरुणांनी वाहन मागे वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जवानांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना काही वेळात पकडले. यामध्ये मुझफ्फर अहमद दार आणि सोफी इसाक अहमद यांचा समावेश आहे. मुझफ्फरकडून एक पिस्तूल, एक मॅगझीन आणि आठ काडतुसे आणि एक ग्रेनेड सापडला आहे, तर सोफी इसाककडून एक ग्रेनेड सापडला आहे. ते दोघेही सीलू येथे कार्यरत असलेल्या त्यांच्या एका साथीदाराला शस्त्रे आणि ग्रेनेड देण्यासाठी आले होते. पोलिसांनी सध्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. (Two arrested for carrying weapons for target killing in Kashmir)

हे सुद्धा वाचा