Buldhana Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, भीषण अपघातात दोन ठार

मित्र पप्पू राजपूत याला घरी सोडण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने पाचही जण साकेगावला जात होते. वाघापूरजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली असलेल्या पळसाच्या झाडावर आदळली.

Buldhana Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, भीषण अपघातात दोन ठार
कार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 30, 2023 | 3:08 PM

बुलढाणा : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. चिखली साकेगाव रस्त्यावरील वाघापूरजवळ आज पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. यश वाधवाणी, आकाश चिंचोले आणि पप्पू राजपूत अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. मृतांपैकी हे सुनील देव्हडे हे चिखली येथील माजी नगरसेवक गोपाळ देव्हडे यांचे लहान बंधू आहेत.

मित्राला घरी सोडायला चालले होते पाच जण

मित्र पप्पू राजपूत याला घरी सोडण्यासाठी स्विफ्ट डिझायर गाडीने पाचही जण साकेगावला जात होते. वाघापूरजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली असलेल्या पळसाच्या झाडावर आदळली. अपघाताने पळसाचे झाडही जमिनीतून मुळासकट उखडले.

भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

या भीषण अपघातात सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर यश वाधवाणी, आकाश चिंचोले, पप्पू राजपूत तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखलीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे चिखली परिसरात शोककळा पसरली आहे.