AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Match Fixing :मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने जगात खळबळ, दिग्गज खेळाडूवर धक्कादायक कारवाई; IPL सुरू होण्याआधीच…

आयपीएलच्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाच एक मोठा खेळाडू मॅच फिक्सिंगच्या आरोपात दोषी ठरला आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Match Fixing :मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने जगात खळबळ, दिग्गज खेळाडूवर धक्कादायक कारवाई; IPL सुरू होण्याआधीच...
IPL 2026Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2026 | 4:51 PM
Share

Javon Searles Match Fixing : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा संपली आहे. या स्पर्धेत भारताने बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. आता ही स्पर्धा संपल्यानंतर आयपीएलच्या स्पर्धेची जगभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रकही समोर आले आहे. येत्या 28 मार्चपासून या स्पर्धेच्या समान्यांना सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात 12 एप्रिलपर्यंत हे सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, एकीकडे आयपीएल सामन्याच्या या 19 व्या हंगामाची देशभरात चर्चा सुरू असताना संपूर्ण जगाला हेलावून टाकणारी क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली एक खेळाडू दोषी ठरला असून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे.

नेमका आरोप काय, कोणत्या स्पर्धेत मॅच फिक्सिंगचे आरोप

वेस्टइंडिजचा गोलंदाज जेवॉन सियर्ल्स याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. तो या आरोपात दोषी ठरला आहे. आयसीसीने या खेळाडूने अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. 2023-24 साली Bim10 League ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत जेवॉन या खेळाडूने भाग घेतला होता. ही स्पर्धा बार्बाडोस येथे आयोजित करण्यात आली होती. याच स्पर्धेदरम्यान त्याने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. जेवॉन सियर्ल्स याच्यासोबतच त्याच्या संघाच्या दोन अधिकाऱ्यांनाही मॅच फिक्सिंगच्या आरोपात दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

आयपीएलमध्ये खेळलेला आहे जेवॉन

जेवॉन याने फिक्सिंगसाठी मिळालेल्या ऑफरबद्दल आयसीसी बोर्डाला माहिती दिली नाही. सोबतच भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास करताना त्यांनी अँटी करप्शन युनिटवच्या चौकशीत त्याने बाधा निर्माण केली. चौकशीत त्याने महत्त्वाची माहिती लपवली, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आता त्याच्यावर बंदी घालण्यात आल्याने तो चर्चेत आला आहे. तो 39 वर्षांचा आहे. तो 2018 साली आयपीएलमध्येही खेळलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून त्याने तीन सामने खेळलेले आहेत. त्याने या सामन्यांत 2 गडी बाद केले होते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल