IPL 2026 : 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या टप्प्यात 20 सामने! पहिली मॅच कधी? जाणून घ्या

IPL 2026 Schedule : बीसीसीआयकडून आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसामासाठी पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या पहिल्या टप्प्यात 20 सामने होणार आहेत.

IPL 2026 : 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या टप्प्यात 20 सामने! पहिली मॅच कधी? जाणून घ्या
IPL 2026 Schedule
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Mar 11, 2026 | 7:53 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार 1 महिना रंगला. क्रिकेट चाहत्यांना 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान 20 संघामध्ये 50 पेक्षा अधिक सामने पाहायला मिळाले. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. त्यानंतर आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जगातील सर्वात मोठ्या टी 20i लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत टी 20i लीग असा लौकीक असणाऱ्या आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयपीएलकडून सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पहिला सामना कधी?

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. विविध 4 राज्यातील विधानसभा निवडणुकींमुळे संपूर्ण हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्याऐवजी निवडक सामन्यांच्याच तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिल्या 15 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्च चे 12 एप्रिल पर्यंतच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या दरम्यान एकूण 4 डबल हेडरसह एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. मोसमातील सलामीचा सामना हा गतविजेता रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना 28 मार्च रोजी होणार आहे.

निवडणुकांमुळेच फक्त पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक

आयपीएल स्पर्धेचं आयोजन हे साधारणपणे मार्चमधील शेवटचा आठवडा ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत केलं जातं. मात्र यंदा 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी पहिल्याच टप्प्यात वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. केरळ, बंगाल, तामिळनाडू आणि आसाम या 4 राज्यात निवडणुका होणार आहे.

10 शहरांत ‘रन’संग्राम

दरम्यान पहिल्या टप्प्यातील सामने हे भारतातील एकूण 10 शहरांमध्ये करण्यात आलं आहे. त्यानुसार गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियम आणि कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. तर इतर ठिकाणी प्रत्येकी 2-2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

पहिल्या 5 दिवसांत पहिली फेरी पार पडेल. अर्थात 5 दिवसात एकूण 10 संघांचा प्रत्येकी 1 सामना खेळू झालेला असेल. त्यानंतर 2 एप्रिलपासून दुसऱ्या फेरीचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उर्वरित वेळापत्रक केव्हा जाहीर होणार? तसेच प्लेऑफमधील सामने कुठे होणार? याची प्रतिक्षा असणार आहे.

Follow Us