ISIS Connection : मालवणीतील दोघांना 8 वर्षांचा तुरुंगगवास व दहा हजार दंड; एनआयए कोर्टाचा निकाल

| Updated on: Jan 07, 2022 | 9:40 PM

यूएपीए कायद्याच्या कलम 20 अन्वये रिजवान आणि मोहसीन या दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या दोघांनी मालाड-मालवणी परिसरातील गरीब मुस्लिम तरुणांना ‘इसिस’मध्ये भरती करण्यासाठी कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केला होता. या गरीब तरुणांना परदेशात नेण्यात आले.

ISIS Connection : मालवणीतील दोघांना 8 वर्षांचा तुरुंगगवास व दहा हजार दंड; एनआयए कोर्टाचा निकाल
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us on

मुंबई : भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी गोरगरीब मुस्लिम तरुणांना भडकावणार्‍या मालवणीतील दोघांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. रिजवान अहमद आणि मोहसीन सय्यद अशी या दोघांची नावे असून ते इसिस या दहशतवादी संघटनेशी काम करीत होते. त्यांनी मालाड मालवणी परिसरातील गोरगरीब मुस्लिम तरुणांना परदेशात नेऊन इसिससारख्या दहशतवादी संघटनेत दाखल होण्यास भाग पाडले, त्यांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केला, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयापुढे केला. यासंदर्भात ठोस पुरावेही सादर केले. एनआयएच्या या दाव्याची आणि सबळ पुराव्यांची दखल घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम न भरल्यास दोन्ही दोषींच्या शिक्षेत तीन महिन्यांची वाढ केली जाणार आहे.

मुस्लिम तरुणांना परदेशात नेऊन दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केले

यूएपीए कायद्याच्या कलम 20 अन्वये रिजवान आणि मोहसीन या दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या दोघांनी मालाड-मालवणी परिसरातील गरीब मुस्लिम तरुणांना ‘इसिस’मध्ये भरती करण्यासाठी कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केला होता. या गरीब तरुणांना परदेशात नेण्यात आले. तसेच त्यांना हिंदुस्थानव हिंदुस्थानच्या मित्रराष्ट्रांविरुद्ध युद्ध छेडण्याच्या हेतूने दहशतवादी संघटनांचे सदस्य बनवण्यासाठी कट-कारस्थाने रचली, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयापुढे सबळ पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले.

एनआयएने 2016 मध्ये दाखल केले होते आरोपपत्र

रिजवान अहमद आणि मोहसीन सय्यद या दोघा तरुणांविरुद्ध 12 डिसेंबर 2015 रोजी काळाचौकीतील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मार्च 2016 मध्ये एनआयएने नव्याने गुन्हा दाखल करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात एनआयएने 18 जुलै 2016 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. पाच वर्षे चाललेल्या या खटल्यात विशेष न्यायालयाने गुरुवारी दोन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांना शिक्षा सुनावली. विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आज हा निकाल दिला आहे. देशात राहून दहशतवाद्यांना पाठबळ देणार्‍या, देशविरोधी कारवाया करणार्‍यांना या निकालाने मोठा दणका बसला आहे. (Two from Malvani were sentenced to 8 years in prison and fined Rs 10,000 in the ISIS connection case)

इतर बातम्या

Bihar Crime: बिहारमध्ये दृश्यमची पुनरावृत्ती, पत्नीच्या प्रियकराला अडकवण्यासाठी प्लॅन करुन मुलीची हत्या

इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; भावानेच केली हत्या