Mumbai : कुर्ला येथील दोन तरुण माहिम कॉजवे येथील मिठी नदीत बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

एकाची बॉडी किनाऱ्यावर सापडली आहे, तर दुसऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Mumbai : कुर्ला येथील दोन तरुण माहिम कॉजवे येथील मिठी नदीत बुडाले, एकाचा मृतदेह सापडला
धक्कादायक
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 12, 2022 | 8:09 AM

मुंबई : कुर्ला (Kurla) येथील दोन तरुण माहिम (Mahim) कॉजवे येथील मिठी नदीत (Mitti River) बुडाले असल्याची माहिती मिळाली आहे. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी कुर्लाहुन गेले होते. काल मध्यरात्री घरी जात असताना, लघुशंकेसाठी दोन मित्र माहीम खाडीवर उभे होते. एकाचा पाय सरकल्याने एक मुलगा खाली पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता दोघेही पाण्यात बुडाले. एकाची बॉडी किनाऱ्यावर सापडली आहे, तर दुसऱ्याचा शोध पोलिस घेत आहेत. आत्तापर्यंत तिथं अशा अनेक घटना घडल्या आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून तिथं बघणाऱ्या लोेकांनी याची माहिती पोलिसांना दिली. मुंंबईत पाऊस असल्याने दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास अधिक त्रास होत आहे.

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे तरुण पाण्यातून वाहून गेला

मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथून आलेला एक युवक पाण्यात पाय घसरून पडला. त्यानंतर तो पाहून गेला असल्याची माहिती मिळाली आहे. वैभव देसाई असं या तरुणांचे नाव आहे,तो मित्रासोबत कुंडमळा परिसरात आला होता. दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रभावित झालेला असताना देखील ते पाण्यात उतरले होते. या प्रवाहात वैभव वाहून गेला आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

पूरात वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या

महाराष्ट्रात मागच्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे राज्यातील नद्यांना पूर आला आहे. आत्तापर्यंत पूरातून वाहून अनेकजण गेले आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्यात कोणीही उतरू नका असं सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे. मुंबई बुडालेल्या तरुणांचा आज सकाळपासून पुन्हा शोध घेण्यात येणार आहे. कारण मुंबईत पाऊस असल्याने शोध कार्यात अनेक अडचणी येत आहेत. एका तरुणाचा मृतदेह पाण्यासोबत किनाऱ्यावर आला आहे. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला असून रुग्णालयात दाखल केला आहे.